Home » Blog » मतदारांवर पैशाचा पाऊस!

मतदारांवर पैशाचा पाऊस!

by प्रतिनिधी
0 comments
A shower of money on voters

मुंबई : प्रतिनिधी : निवडणुकीत वारेमाप आश्वासनांच्या पावसानंतर आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून पैशाचा पाऊस पडू लागला आहे. मतदारांना घरपोच नोटा पोच केल्या जात असून हे चित्र २९ महानगरपालिकेतील क्षेत्रात दिसत आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी पैसे वाटताना धाडी टाकल्या असल्या तरी सत्ताधारी आणि विरोधी उमेदवार ‘हमाम मे सब नंगे’ असे चित्र पहायला मिळत आहे.

निवडणूकीच्या घोषणा झाल्यानंतर कार्यकर्ते आणि मतदारांवर पक्ष आणि त्यांचे उमेदवार फिदा झाले आहेत. गेले आठवडाभर जेवणावळी सुरू आहेत. शहरातील हॉटेलमध्ये जेवणासाठी उमेदवारांकडून पासेसचे वाटप केले जात आहे. शहराच्या हद्दीबाहेरील मंगल कार्यालयात वाढदिवस, जाऊळ, बारशांचे फलक लावून जेवणावळी उठत आहेत. महानगरपालिका क्षेत्रात ड्राय डे असल्याने शहराच्या हद्दीबाहेरील मद्य विक्रीची दुकाने रात्रभर खुली सुरू आहेत. (A shower of money on voters)

काल मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता मतदान संपल्यानंतर पैसे वाटपाचा कार्यक्रम धुमधडाक्यात सुरू आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, कडोंमपा, अहिल्यानगर, पुणे, नागपूर या मोठ्या महानगरपालिकेत पैसे वाटण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक धाडी टाकत आहेत. काही पक्षांनी स्टिंग ऑपरेशनही केली आहेत. मुंबईत तर पैसे वाटपावर राडा झाल्याने महिला उमेदवारांच्या पतीचे डोकेही फुटले आहे.  निवडणूकीत पैसे वाटपच करायचे असा रिवाजच पडला आहे. तरुण मंडळे, ग्रुप, महिला बचत गटांना मोठी पाकिटे पोच झाली आहेत. तर अनेक पक्षाचे कार्यकर्ते थेट घरी जाऊन मतदारांना पाकिटे दिल जात आहे. पैशाचे पाकिट महिलांच्याकडे द्यावे अशा सूचना दिल्या आहेत. महिलांना पैस दिले तर मतदानात दगाफटका होत असा युक्तीवादही केला जात आहे. व्यसनी, कर्जबाजारी मतदारांना पैशाचे पाकिट वाटू नका. त्यांची नड वेगळ्या पद्धतीने भागवा, असे सल्लेही इच्छुक उमेदवाराकडून दिले जात आहेत. (A shower of money on voters)

उमेदवारांच्या घरासमोर बेरकी कार्यकर्ते पैशाची वाट पहात बसल्याचे सार्वत्रिक चित्र पहायला मिळत आहे. पाकिट वाटपाचे काम निष्ठावंत कार्यकर्त्याकडे देण्यात आले आहेत. त्यासाठी याद्याही करण्यास सांगितले आहे. बेरकी कार्यकर्ते उमेदवारांच्या कार्यालयात जाऊन आमच्याकडे इतके मतदार आहेत याच्या याद्या घेऊन पैसे मागण्यासाठी जात आहेत. पण बहुतांशी उमेदवारांनी त्यांच्याकडून याद्या घेत पैसे वाटपाची यंत्रणा राबवत आहेत. त्यामुळे बेरकी कार्यकर्ते हवालदील झाले आहेत. एकदंरीत मकर संक्रांतीला सूर्यांचे दक्षिणायन सुरू असताना मतदारही दक्षिणा कधी मिळणार याची वाट पहात आहेत. बुधवारची रात्र ही पैशाचा पाऊस पडणारी ठरणार असे सार्वत्रिक चित्र पहायला मिळत आहे. (A shower of money on voters)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00