Home » Blog » अमित शाह चकाट्या पिटणारे गृहमंत्री  : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

अमित शाह चकाट्या पिटणारे गृहमंत्री  : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

by प्रतिनिधी
0 comments
Uddhav Thackeray launches an attack on Amit Shah

जमीर काझी :  मुंबई :  अमित शाह हे केवळ चकाट्या पिटणारे केंद्रीय गृहमंत्री आहेत. त्यांच्यात थोडीतरी हिम्मत असेल तर त्यांनी मणिपूर, अरुणाचल प्रदेशात जावे, असे आव्हान  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी मंगळवारी त्यांना दिले.त्याचबरोबर अजित पवार यांच्या पुतळ्यासमोर जाऊन त्यांनी नाक घासून माफी मागितली पाहिजे असाही हल्लाबोल केला. (Uddhav Thackeray launches an attack on Amit Shah)

जेन झी आंदोनाच्यावेळी लोकसभेऐवजी बाथरुममध्ये बसले होते

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अमित शाह यांनी काल पुण्यात अजित पवार यांच्या पुतळा अनावरप्रसंगी नाव न उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्याला प्रत्यु्त्तर देताना ठाकरे म्हणाले ,’ अमित शाह हे  चकाट्या पिटणारे  गृहमंत्री आहेत. किती दिवसांनी ते अवतीर्ण झाले आहेत.  दिल्लीत जेव्हा जेन -झी वर अत्याचाराबाबत लोकसभेत विचारणा करण्यात येत होती, तेव्हा ते लोकसभेतील बाथरुममध्ये जाऊन बसायचे  पण सभागृहात येत नव्हते, असा हा चकाट्या पिटणारा गृहमंत्री, त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत चकाट्या पिटण्याखेरीज दुसरे काहीही केलेले नाही. (Uddhav Thackeray launches an attack on Amit Shah)

अमित शाहांनी अजित पवारांच्या पुतळ्यासमोर नाक रगडले पाहिजे

 उद्धव ठाकरे म्हणाले ‘  अजित पवार  हयात असताना ७० हजार कोटींचा घोटाळा केला म्हणून भ्रष्टाचाराच्या आरोपांनी जीवन मुश्कील करुन ठेवले होते. त्याच अजित पवारांचा पुतळा या चकाट्या पिटणाऱ्याच्या हस्ते त्याचं अनावरण होणं हे दुर्भाग्य आहे . पण अपेक्षा अशी होती की अनावरण केल्यानंतर ते पुतळ्यासमोर  नाक रगडून अजित पवारांची माफी मागतील. आम्ही तुमच्यावर केलेले आरोप खोटे होते, तुम्ही थोर होतात. जी थोरवी त्यांनी काल गायली त्यातले दोन शब्द तरी अजित पवार हयात असताना बोलते असते तर अजित दादाना समाधान लाभले असते. आताही त्यांनी मध्यरात्री कोणाच्या न कळत त्यांच्या पुतळ्यासमोर जाऊन नाक रगडले पाहिजे.

गुजरातमध्ये कोविड काळात सार्वजनिक चिता महाराष्ट्रात पेटल्या होत्या

कोविडमध्ये अमित शाह यांनी फोन केले आणि मी घेतले नाहीत ,हे जर खरे असते तर उत्तर प्रदेशमध्ये गंगेत शव सोडण्यात आली, गुजरातमध्ये सार्वजनिक चिता महाराष्ट्रात पेटल्या, तसे चित्र महाराष्ट्रात दिसले नाही . महाराष्ट्रात धारावी असो की आणखी संपूर्ण यंत्रणा काम करत होती. जे मोदींना थाळ्या पिटून जमलं नाही ते  महाराष्ट्राने करुन दाखवले होते. अशी  भंपक माणसं घालवली पाहिजेत, असा पुनरुच्चार त्यांनी केला. कोविडच्या काळात सर्वोत्तम मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं, तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून मी होतो, मात्र सर्व श्रेय यंत्रणांचं होते. हा उल्लेख झाला होता, पण मी असे म्हटलं की हे सांगण्यात काही अर्थ आहे. कारण निर्बुद्ध माणसासमोर काही बोललं तरी काही फरक पडेल, असं वाटत नाही. असा टोलाही लगावला.

चकाट्या पिटणाऱ्या माणशाच्या हातात देश आहे

ते म्हणाले, अमित शाह यांनी चकाट्या पिटण्याऐवजी मणिपूरमध्ये जायला पाहिजे. अरुणाचल प्रदेशची लोकं आक्रोश करत आहेत, त्यांचा फोन अमित शाह घेत नाहीत. जर हा माणूस शूर असेल तर तिथल्या सैन्याच्या छावणीत जाऊन बसलं पाहिजे. सैनिकांचं, देशवासियांचं आणि अरुणाचल  प्रदेशचं नागरिक सैन्यासोबत चीन विरोधात लढत आहेत. पण चकाट्या पिटणाऱ्या माणसाच्या हातात देश आहे, हे रेजिम बदलण्याशिवाय पर्याय नाही.  

रोहित पवारांनी उपस्थित  प्रश्नांची  चौकशी व्हावी

अजित पवार यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्हीआरएस कंपनीच्या मालक व्ही.के .सिंग याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत आहेत असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की , त्यांनी उपस्थित केलेल्या शंका रास्त आहेत अजूनही जर एफआयआर होत नसेल तर शंका घेण्यास वाव आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हायला हवी. सत्य जनतेसमोर यायला हवे. (Uddhav Thackeray launches an attack on Amit Shah)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!