Home » Blog » जरांगेंकडून ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी एसआयटी ची मागणी

जरांगेंकडून ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी एसआयटी ची मागणी

by प्रतिनिधी
0 comments
Jarange demands an SIT probe into the audio clip

जमीर काझी :  मुंबई :  मराठा समाजाचे संघटक मनोज जरांगे-पाटील यांना ५०० कोटी देऊन ‘मॅनेज’ करण्याच्या कथित ऑडिओ क्लिपने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असताना जरांगे -पाटील यांनी आणखी आक्रमक झाले आहेत. संबंधित ऑडिओ क्लिप बनावट किंवा ‘एआय’ द्वारे बनविल्याचा दावा करणाऱ्यांना भाजपाच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर देताना आंदोलन आणि मराठा समाज संपवण्यासाठी रचलेले एक मोठं षडयंत्र असून त्याची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. (Jarange demands an SIT probe into the audio clip)

रामदास कदमांनी क्लिपची तारीख, वर्ष आधीच कसं सांगितलं?

जरांगे- पाटील यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं की, ‘हे काम ओरिजिनल असून ती कोणतीही एआय क्लिप नाही. त्यामुळे सत्य समोर येण्यासाठी या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात जे कोणी दोषी किंवा संबंधित असतील, त्यांच्यावर तातडीने छापे टाकून सत्य बाहेर आणले पाहिजे. आरोपी सरकारमधील किंवा सत्ताधाऱ्यांचे स्वतःचे लोक असले तरी त्यांना सोडू नये, “तुमचे लोक आहेत म्हणून खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरे करू नका,” असा थेट इशारा त्यांनी फडणवीस आणि शिंदे यांना दिला. आम्ही क्लिप दाखवण्याच्या तीन तास आधीच ती व्हायरल कशी झाली? तसेच रामदास कदम यांनी क्लिपच्या घटनेची तारीख आणि वर्ष आधीच कसं सांगितलं?, याबाबतही त्यांनी तीव्र संशय व्यक्त करत या सर्व बाबींचा तपास करण्याची मागणी केली आहे. (Jarange demands an SIT probe into the audio clip)

तीन तास अगोदर ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर कशी पोहोचली

  कदम यांनी संबंधित ऑडिओ क्लिप कोणत्या तारखेची आणि वर्षाची आहे, हे सांगितल्याचा मुद्दा उपस्थित करत जरांगेंनी त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. शिंदेंच्या पक्षातील नेते ही क्लिप खोटी असल्याचं सांगत असतील, तर रामदास कदमांना क्लिपची तारीख नेमकी कशी समजली? त्यांना ही माहिती कोणी दिली? याचाही तपास झाला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की आपण या विषयावर बोलण्याच्या तीन तास आधीच संबंधित ऑडिओ क्लिप माध्यमांपर्यंत कशी पोहोचली, याची चौकशी करावी.  उदय सामंत हे सत्याच्या बाजूने तर रामदास कदम हे संभ्रम निर्माण करत आहेत. या प्रकरणामागे कोणाचे षड्यंत्र होतं? याचा उलगडा झाला पाहिजे. एकनाथ शिंदेंच्या मागेही काही राजकीय डाव सुरू असल्याचा दावा करत, आपण ऑडिओ क्लिप समोर आणल्यानंतर संबंधितांनी त्यावर उत्तर देणे अपेक्षित होतं, असेही मनोज जरांगेंनी सांगितले. (Jarange demands an SIT probe into the audio clip)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!