Home » Blog » भारतीय कॅप्टन स्मित यांच्या बहादुरीमुळे विमान पाडण्याचा प्रयत्न उधळला

भारतीय कॅप्टन स्मित यांच्या बहादुरीमुळे विमान पाडण्याचा प्रयत्न उधळला

by प्रतिनिधी
0 comments
The bravery of pilot Captain Smit Machhar

नवी दिल्ली : प्रतिनिधी : दुबईहून तेल अवीव कडे  जाणारे विमान पाडण्याचा डाव भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांच्या बहादुरीमुळे उधळला गेला. कॅप्टन स्मित यांच्यावर सह वैमानिकाने धारदार शस्त्राने हल्ला केल्यानंतरही धाडसाने हल्ला परतावून लावत प्रसंगावधान राखल्याबद्दल जगभर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. इस्त्रालयाचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी मी त्या वीरांना सलाम करतो. ज्यांनी आपवादात्मक कल्पकता आणि धैर्य दाखवले. अशा शब्दात कौतुक केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ९/११ सारखा हल्ला टळला अशी प्रतिक्रिया देत कॅप्टन स्मित यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे. (The bravery of pilot Captain Smit Machhar)

फ्लायदुबई कंपनीचे विमान दुबईहून तेल अवीवला जात होते. विमानात २७ मुलांसह १७४ प्रवाशी होते. प्रवाशांमध्ये इस्त्रायली नागरिकांचा प्रवाशांची संख्या जास्त होती. विमान जास्त उंचीवर असताना विमानाचे मुख्य पायलट स्मित मच्छर यांच्यावर ओमानच्या सह वैमानिकाने धारदार शस्त्राने हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने स्मित यांचे विमानावरील नियंत्रण सुटले. विमान वेगाने खाली येऊ लागले. विमान सुमारे ३४ हजार फुटांवरुन २० हजार फुटापर्यंत खाली वेगाने येत होते. त्याही परिस्थितीत त्यांनी विमान हायजॅकचा मेसेज पाठवला. त्यावेळी विमान जॉर्डन देशावरुन उडत होते. कॉकपिटमध्ये मोठ्या आवाजामुळे प्रवाशीही घाबरले. हल्लेखोर विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत असताना कॅप्टन स्मित यांनी कॉकपीटचा दरवाजा उघडल्यामुळे तीन इस्त्रायली प्रवाशांनी कॉकपिटमध्ये धाव घेतली. त्यांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले. विमानात आणखी जे दोन पायलट होते. त्यांनी कॉकपिटमध्ये प्रवेश करुन काही सेकंदातच विमानाचा ताबा घेतला. त्यावेळी विमान १४ हजार फुटांपर्यंत खाली आले होते.  त्यानंतर ते सौदी अरेबियातील तबुक येथील प्रिन्स सुलतान बिन अब्दुल अझीझ विमानतळावर वळवण्यात आले. आणीबाणीची स्थिती असतानाही विमान दुर्घटना न होता सुरक्षित लँडिंग झाल्याने १८० प्रवाशांचे प्राण वाचले. या हल्ल्यात कॅप्टन स्मित जखमी झाले. सुरवातीला विमानातच एका इस्त्रायली डॉक्टराने त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर सौदी अरेबियातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. (The bravery of pilot Captain Smit Machhar)

इस्त्रायली विमाने कारवाईसाठी झेपावली

विमानातून आपत्कालीन परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर इस्त्रायलचे नागरी विमान वाहतूक प्राधिकरण, हवाई आणि राजकीय नेतृत्वाला त्वरीत सतर्क करण्यात आले. काही सेकंदातच विमान हद्दीत पोहोचण्याची शक्यता होती. हवाई दलाची विमाने आकाशात झेपावली पण विमान सुरक्षितरित्या उतरवल्यानंतर लढाऊ विमानांना परत बोलावण्यात आले अशी माहिती भारतातील इस्त्रायली राजदूत रुवेन अझर यांनी दिली.

इस्त्रायल वर विमान पाडण्याचा कट?

विमानाचा ताबा घेऊन विमान इस्त्रायलवर पाडण्याच्या कटाची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिक्रिया देताना कॅप्टन स्मित यांनी दाखवलेल्या बहादुरीमुळे ९/११ सारखा हल्ला टळला अशी प्रतिक्रिया दिली आहे. इस्त्रायलमध्ये २७ ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत. तसेच ७ ऑक्टोबरला हमास प्रणित हल्लाचा स्मृतिदन होणार आहे. त्याच्या काही दिवस ही घटना घडल्याने हल्लेखोराचा हेतू काय होता हे तपासातून स्पष्ट होणार आहे.

कॅप्टन स्मित मच्छर यांना गुजरात गरिमा पुरस्कार

विमान पाडण्याचा कट उधळून लावणाऱ्या भारतीय वैमानिक स्मित मच्छर यांना विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी केली आहे. त्यांच्या शौर्याला जग सलाम करत आहे. हल्लामुळे शरीर रक्ताने माखलेल असतानाही त्यांनी १७४ प्रवाशांचे प्राण वाचवण्याचे हे शौर्य दाखवले ही अत्यंत प्रेरणादायी आणि प्रशंसनीय कामगिरी आहे असे पटेल यांनी म्हटले आहे.

कोण आहेत कॅप्टन स्मित मच्छर

कॅप्टन मच्छर हे मुळचे गुजरातचे आणि मुंबईत वास्तव्य करणारे असून जून २०२२ पासून ते फ्लायदुबईमध्ये कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी व्यावसायिक पायलट म्हणून ओळख असलेल्या कॅप्टन स्मित यांना ७३७ बोईंग विमान उडवण्याचा १३ वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. फ्लायदुबईत रुजू होण्यापूर्वी ते स्पाईसजेटमध्ये ११ वर्षे वरिष्ठ कमांडर आणि लाईन ट्रेनिंग कॅप्टनमध्यून म्हणून काम पाहिले आहे. मच्छर यांनी ९५०० तासाहून अधिक काळ उड्डाण केले आहे. (The bravery of pilot Captain Smit Machhar)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!