Home » Blog » Ben Stokes : भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर आटोपला, स्टोक्सचे पाच बळी

Ben Stokes : भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर आटोपला, स्टोक्सचे पाच बळी

by प्रतिनिधी
0 comments
Ben Stokes

मँचेस्टर : भारत विरुद्ध इंग्लंड मधील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या. दुसऱ्या दिवसात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही. इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने भेदक मारा करताना पाच गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंड संघाने चहापानापर्यंत नाबाद ७७ धावा केल्या.  झॅक क्रॅव्हलीने ३३ धावा तर बेन डकेटने ४३ धावा केल्या.      (Ben Stokes)

कालच्या ४ बाद २६४ धावसंख्येवरुन भारताने दुसऱ्या दिवशी डाव सुरु केला. डावखुरा रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरला इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजांनी चांगलेच सतावले. दुसऱ्या दिवशी इंग्लंडला जडेजाच्या रुपाने पहिले यश मिळाले. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रुकने त्याचा झेल पकडला. जडेजा फक्त वीसच धावा करु शकला. त्यानंतर शार्दुल आणि वॉशिंग्टन सुंदरने भारतीय संघाचा किल्ला लढविला. शार्दुल ठाकूरने खराब चेंडू धाडसाने सीमापार टोलवले. दोघांनी ३०० धावांचा टप्पा ओलांडला. दोघांची जोडी जमली असे वाटत असताना कर्णधार बेन स्टोक्सने जोडी फोडली. स्टोक्सच्या गोलंदाजीवर बेन डकेटकडे झेल देऊन शार्दुल तंबूत परतला. त्याने पाच चौकार मारत ८८ चेंडूत ४१ धावा केल्या. त्यावेळी भारताच्या ८ बाद ३१४ धावा होता. बेन स्टोक्स चांगलाच फार्मात होता. त्याने एकाच षटकात वॉशिंग्टन सुंदर आणि अंशुल कांबोजला बाद केले. सुंदरने ९० चेंडूत २७ धावा केल्या. कांबोजला भोपळाही फोडता आला नाही. (Ben Stokes)

त्यानंतर काल जखमी होऊन मैदानात गेलेला ऋषभ पंतने फटकेबाजीचा प्रयत्न केला. त्याने जखमी अवस्थेतही अर्धशतक साजरे केले. इंग्लिश गोलंदाजांना त्याच्या पायावर मारा करण्याचा प्रयत्न केला. पण जोफ्रा आर्चरच्या एका सुरेख चेंडूवर पंत बाद झाला. त्याने तीन चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने ५४ धावा केल्या. जोफ्रा आर्चरने जसप्रित बुमराह ४ बाद करत भारतीय संघाचा पहिला डाव ३५८ धावांवर संपुष्टात आणला. मोहमद सिराज पाच धावांवर नाबाद राहिला.

इंग्लंडकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला तो बेन स्टोक्स. त्याने २४ षटकात ७२ धावा देत पाच गडी बाद केले. त्याला तीन गडी बाद करणाऱ्या जोफ्रा आर्चरची साथ मिळाली. ख्रिस वोक्स आणि लियाम डॉसन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. (Ben Stokes)

भारतीय संघाच्या पहिल्या डावाचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडकडून सलामीची झॅक क्रॅव्हली आणि बेन डकेट ही जोडी मैदानात आली. त्यांनी भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाज सडेतोड उत्तर देत संघाचे अर्धशतक फडकावले. त्यांनी बुमराह, कांबोज आणि मोहम्मद सिराजची डाळ सिजू दिली नाही. चहापानाला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने ७७ धावा केल्या. झॅक क्रॅव्हलीने ३३ तर बेन डकेटने ४३ धावा केल्या होत्या.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00