Home » Blog » दहा वेळा चकरा मारुन पैसे न मिळाल्याने कंत्राटदाराची आत्महत्या

दहा वेळा चकरा मारुन पैसे न मिळाल्याने कंत्राटदाराची आत्महत्या

by प्रतिनिधी
0 comments
Contractor commits suicide due to non-receipt of outstanding payment

मुंबई : प्रतिनिधी : राज्य सरकारकडून थकीत बिलाची पुर्तता न झाल्याने कंत्राटदाराने टोकाचे पाऊल उचलले. शासकीय कामाच्या बिलासाठी दहा वेळा कार्यालयाचा चकरा मारुन बिल मिळत नसल्याने कंत्राटदार गजानन देवकाते यांनी आत्महत्या केली. या घटनेने कंत्राटदारांच्या बिलांचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. (Contractor commits suicide due to non-receipt of outstanding payment.)

शासकीय कंत्राटदारांचे तब्बल ८६ हजार कोटी रुपयांचे थकीत बिल असून यासाठी कंत्राटदार राज्य सरकारकडे बिल अदा करण्याची मागणी केली आहे. त्यांनी राज्यातील मंत्रीमहादेयांनाही निवेदन देऊन बिले देण्याची मागणी केली आहे. विरोधी नेत्यांचीही भेट घेतली जात आहे पण त्यांची दखल कोणीच घेत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. काल मंगळवारी कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी राज ठाकरे यांची भेट घेऊन थकबाकीत तोडगा करण्याची मागणी केली होती. आणि दुसऱ्याच दिवशी गजानन देवकाते यांनी आत्महत्या केली. (Contractor commits suicide due to non-receipt of outstanding payment.)

मिळालेल्या माहितीनुसर गजानन देवकाते यांनी २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीत पाटबंधारे विभागाची ६० लाखांची कामे केली होती. कामे पूर्ण होऊनही कामाचे पैसे मिळाले नव्हते. आपल्या कष्टाचे पैसे मिळावेत यासाठी देवकाते यांनी वर्षभरापूर्वी मुख्य अभियंत्यांना पत्रही लिहिले होते. बिलासाठी त्यांनी शासकीय कार्यालयात दहा वेळा चकरा मारल्या होत्या. थकीत बिलाचे पैसे मिळत नसल्याने नैराश्यातून गजानन देवकाते यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असे बोलले जात आहे. (Contractor commits suicide due to non-receipt of outstanding payment.)

गेल्या काही दिवसापासून थकीत ८६ हजार कोटींच्या बिलांसाठी आंदोलन करत आहेत. १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्रलंबित असलेली सर्व पात्र बिले तातडीने द्यावीत ही प्रमुख मागणी आहे. सरकारने निश्चित कालमर्यादेत बिले अदा करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी सांगलीतील कंत्राटदाराने आत्महत्या केली होती. (Contractor commits suicide due to non-receipt of outstanding payment.)

You may also like

error: Content is protected !!