Home » Blog » आयसीएआय कोल्हापूर शाखेतर्फे एमएसएमई महोत्सवाचे आयोजन

आयसीएआय कोल्हापूर शाखेतर्फे एमएसएमई महोत्सवाचे आयोजन

by प्रतिनिधी
0 comments
MSME Festival organized by ICAI

कोल्हापूर : प्रतिनिधी :  इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)  कोल्हापूर शाखा आणि एमएसएमई आणि स्टार्टअप कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने “उत्थान  – एमएसएमई महोत्सव २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे.   द पॅव्हिलियन हॉटेल मधुसुदन हॉल येथे २ जुलै होणाऱ्या या महोत्सवाला  देशभरातील नामांकित मान्यवर, तज्ञ वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आयसीएआय चे केंद्र व प्रादेशिक परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत.उत्थान एमएसएमई महोत्सवासाठी क्रिएटीव्ह सेल्स  अँड  सर्विस  (टॅली) , बँक ऑफ  इंडीया, कॅनरा बँक, प्रोफेशनल सपोर्ट्स (सीए. यतिराज  मर्दा) यांचे  आर्थिक सहकार्य  लाभले.

उद्योग, बँका, शासनामध्ये समन्वय साधणार

अध्यक्ष सीए आशिष सेवेकरी यांनी महोत्सवाची माहिती दिली. ते म्हणाले,  यावर्षाची थीम सिनर्जी (SYNERGY) आहे. या थीमचा मुख्य उद्देश विविध घटकांना एकत्र आणून सामूहिक विकास साधणे हा आहे. ” उत्थान  – एमएसएमई महोत्सव २०२६” हा त्याच विचाराचा एक भाग असून उद्योग, व्यावसायिक, बँका आणि शासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. (MSME Festival organized by ICAI)

एक दिवसीय महोत्सवामध्ये एमएसइमई साठी विविध शासकीय योजना व संधी, वित्तपुरवठा व गुंतवणूक विषयक मार्गदर्शन, केंद्र व राज्य शासनाचे अनुदान योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन, उद्योग क्षेत्रातील नेटवर्किंगच्या संधी, उद्योगवाढीसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन व पॅनेल चर्चा यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर देशातील नामांकित विषय-तज्ञांचे परिसंवाद व सत्रे आयोजित केली आहेत.

मान्यवरांचे मार्गदर्शन

महोत्सवात  सी.ए. चंदन लाहोटी  हे एमएसएमई क्षेत्रातील विविध व्यवसायिक संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. धनेश राळे  हे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसमोरील (MSMEs) समस्या आणि त्यांवर मात करण्यासाठी व्यावहारिक उपाय (कामगार कायदे, मानवी संसाधन व्यवस्थापन, पर्यावरण व स्थानिक प्राधिकरणे) याचे विश्लेषण करणार आहेत. सी.ए. यतिराज मर्दा  केंद्र व राज्य शासनाच्या प्रोत्साहनपर योजना, अनुदाने व लाभ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. सी.ए. नितीन हारगुडे  हे कर्ज घेताना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSMEs) भेडसावणाऱ्या अडचणी आणि सिद्धार्थ पंडित हे ब्रँडिंग आणि व्यवसायाचा प्रभावी प्रचार कसा करावा याबाबत मार्गदर्शन करणार आहे. (MSME Festival organized by ICAI)

महोत्सवातील नोंदणीसाठी आयसीएआय कोल्हापूर शाखेने विशेष ऑनलाइन व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: सीए भवन (८०१०७५०५९७) | स्वप्निल सादळे (८७९६२४३२७३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला  सी.ए. आलोक शाह (उपाध्यक्ष कोल्हापूर शाखा), सी.ए. राघवेंद्र बकरे (सचिव), सी.ए. नितीन हरगुडे (व्यवस्थापन समिती सदस्य),  स्वप्निल सादळे (शाखा व्यवस्थापक) उपस्थित राहणार आहेत. (MSME Festival organized by ICAI)

You may also like

error: Content is protected !!