Home » Blog » उच्च न्यायालयाकडून अवसायनातील दूध संस्था गोकुळ निवडणूकीसाठी पात्र

उच्च न्यायालयाकडून अवसायनातील दूध संस्था गोकुळ निवडणूकीसाठी पात्र

by प्रतिनिधी
0 comments
Milk society under liquidation eligible for Gokul election

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अवसायानात काढलेल्या ६४४ दूध संस्थाना पात्र ठरवले आहे. त्यामुळे आगामी गोकुळच्या निवडणुकीत या संस्थाना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने भाजपला मोठी चपराक बसली असून मंत्री हसन मुश्रीफ यांचे निवडणुकीतील पारडे जड शक्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Milk society under liquidation eligible for Gokul election)

कमी दूध संकलन आणि तांत्रिक कारणे दाखवत सहाय्यक निबंधक दुग्ध कृष्णा ठाकरे यांनी गोकुळ संघाशी संलग्न असलेल्या ६४४ सभासद संस्था गोकुळच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरवल्या होत्या. या संस्थांनी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठाकडे धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी होऊन कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांनी महत्वपूर्ण निकाल देत अवसायनातील सर्व संस्थाना निवडणुकीसाठी पात्र ठरवले आहे. सहाय्यक निबंधक ठाकरे यांनी अवसायनातील दिलेल्या संस्थाबाबतचे आदेश हे नैसर्गिक तत्वाला धरुन नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. दूध संस्थांच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ श्रीनिवास पटवर्धन, अड भूषण मंडलिक, प्रबोध पाटील धैर्यशील पवार यांनी काम पाहिले. सरकाच्यावतीने अड सतीश तळेकर यांनी काम पाहिले. निकालानंतर संस्था प्रतिनिधींनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्याची आतषबाजी करत आनंद साजरा केला. (Milk society under liquidation eligible for Gokul election)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!