Home » Blog » Shashikant Shinde elected: शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष

Shashikant Shinde elected: शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष

by प्रतिनिधी
0 comments
Shashikant Shinde elected

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे यांची निवड जाहीर करण्यात आली. पक्षाच्या मंगळवारी (१५ जुलै) झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. (Shashikant Shinde elected)

आमदार जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून अता शिंदे महाराष्ट्रात पक्षाची धुरा सांभाळतील.

दरम्यान, पाटील यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. एक्सवरील पोस्टमध्ये पाटील यांनी म्हटले आहे की, माझे सहकारी, विधान परिषदेचे सदस्य शशिकांत शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर चालणार्‍या पक्षाचा “सर्वसामान्य कार्यकर्ता” हा गाभा आहे. मागच्या काळात आपला पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी मिळून केले. आपण हा पक्ष त्यापेक्षा अधिक बळकट कराल असा मला विश्वास आहे. त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा! (Shashikant Shinde elected)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. मी महाराष्ट्रातील जनतेला ग्वाही देतो की राज्यातील प्रत्येक प्रश्नांना आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करेन. तसेच पक्ष संघटना राज्यात सगळीकडे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेन. पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असतानाही मला जी प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली, या संधीचे सोने करण्याचा मी प्रयत्न करेन.
-आ. शशिकांत शिंदे, नूतन प्रदेशाध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असताना २०१८ मध्ये शरद पवार यांनी सुनील तटकरे यांच्या जागी जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या नेतृत्वाखाली २०१९ ची निवडणूक राष्ट्रवादीने लढवली होती. अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर जयंत पाटील मात्र शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला कमी जागा मिळाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु होती. प्रदेशाध्यक्षपदी युवा चेहऱ्याला संधी देण्याची चर्चा सुरू होती. पण जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदी कायम राहिले. (Shashikant Shinde elected)
गेल्या माहिन्यात १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनी पाटील यांनी मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर एक महिन्यानी जयंत पाटील यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित झाले होते. शिंदेंसह राजेश टोपे, रोहित पवार यांची नावेही चर्चेत होती, पण शशिकांत शिंदे यांना संधी मिळाली.

शरद पवार यांच्यासोबतच राहणार : जयंत पाटील
प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतानाच्या काळात पक्षाला बरे वाईट दिवस आले. पण पवार साहेबांच्या आदेशानुसार काम करत राहिलो, राज्यभर दौरे करून पक्ष वाढविण्याचा प्रयत्न केला. यापुढेही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षासाठी कार्यरत राहणार आहे. हा शेवट नसून नवीन सुरवात आहे, असे मावळते अध्यक्ष जयंत पाटील यावेळी म्हणाले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00