Home » Blog » थायलंडमध्ये विद्यार्थ्याचा शाळेवर अंदाधुंद गोळीबार; आठ ठार

थायलंडमध्ये विद्यार्थ्याचा शाळेवर अंदाधुंद गोळीबार; आठ ठार

by प्रतिनिधी
0 comments
School shooting in Thailand

नवी दिल्ली : थायलंडमध्ये एका शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात किमान आठ जणांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर विद्यार्थ्यांने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी घटलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. (School shooting in Thailand)

थायलंडची राजधानी बँकॉकच्या वायव्येस असलेल्या नॉनथाबुरी प्रातांतील बांग क्रु आई जिल्ह्यातील देबसिरिन नॉनाथाबुरी शाळेत ही घटना घडली. गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्यांची पोलिसांनी ओळख पटवली आहे. तसेच त्याने आत्महत्या केल्याच्या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. गोळीबारात किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून एक शिक्षक आणि तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. शाळेत ३१०० विद्यार्थी आणि १४७ शिक्षक होते. (School shooting in Thailand)

  थायलंडच्या पोलिसांनी याबाबत माहिती दिली. बंदुकधारी विद्यार्थ्याने आधी आपल्या आजी आणि आजोबांना गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर त्याने शाळेवर गोळीबार केला. यावेळी बचावासाठी विद्यार्थी डेस्कखाली लपले. पोलिसांच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना २६ गोळ्या झाडल्या. घटनास्थळावरुन आणखी ३४ गोळ्या जप्त केल्या. घटनेनंतर पोलिस आणि बचाव पथकांनी धाव घेतली. विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. तसेच जखमी विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. (School shooting in Thailand)

You may also like

error: Content is protected !!