Home » Blog » पोलिसांची व्हॅन अडविणाऱ्या रिया अहिरेला धमक्या आणि शिवीगाळ

पोलिसांची व्हॅन अडविणाऱ्या रिया अहिरेला धमक्या आणि शिवीगाळ

by प्रतिनिधी
0 comments
Threats against Riya Ahire

जमीर काझी : मुंबई : केंद्रीय मंत्री धर्मेंद प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी  विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी शिवाजी पार्क परिसरात एकहाती मुंबई पोलिसांची व्हॅन अडवून ‘पोस्टर गर्ल’ बनलेल्या रिया अहीरने आता संरक्षणासाठी  मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आहे . तिच्या व्हायरल  व्हिडिओबद्दल तिला व तिच्या कुटुंबियांना धमकी व अश्लील शिवीगाळ केली जात आहे. सोशल मीडियावर ट्रोल  करण्यात येत असल्याने  तिने सायबर पोलिसाकडे तक्रार केली आहे. (Threats against Riya Ahire)

रियाची सायबर पोलिसांकडे तक्रार

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी२२  मुंबईत तरुणांनी निदर्शने करत शांततेत आंदोलन केले. मुंबईच्या शिवाजी पार्कात झालेल्या आंदोलनात रियाने पोलिसांची व्हॅन रोखली होती. पोलिसांची व्हॅन एका हाताने रोखणाऱ्या रियाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. पण आता मात्र तिने  महाराष्ट्र सायबर सेलमध्ये एक तक्रार दाखल केलीय. (Threats against Riya Ahire)

सत्यता तपासून ट्रोलवाल्यांवर पोलिस कारवाई करणार

शिवाजी पार्क परिसरातील आंदोलनातील आपला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंग, बुलिंग आणि धमक्यांचा सामना करावा लागत असल्याचे  एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी रियाने सोमवारी पुन्हा  सायबर सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.  तिच्या आरोपांचा तपास सुरू असून,  सत्यता पडताळून योग्य ती कारवाई केली जाईल,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. (Threats against Riya Ahire)

माझ्यामुळे घरच्यांना त्रास कशाला? 

“मला सध्या प्रचंड ट्रोल केलं जात असून मला आणि माझ्या कुटुंबालाही मानसिक त्रास दिला जातोय.  ऑनलाईन बुलिंग आणि शिवीगाळ करत आहेत. माझ्या चारित्र्यावरदेखील प्रश्न उपस्थित केले जातायेत. काहीजण मला घरी येऊन किंवा बाहेर गाठूनही त्रास देण्याची भाषा करत आहेत. या सगळ्यामुळे माझ्या आई-वडिलांनाही चिंता आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नको,” अशी प्रतिक्रिया रिया अहिरेने दिली. (Threats against Riya Ahire)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!