Home » Blog » निवृत्त हवाई योद्ध्याने मिळविली शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी

निवृत्त हवाई योद्ध्याने मिळविली शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी

by प्रतिनिधी
0 comments
Shivaji University awards PhD to Air Force warrior

कोल्हापूर  : प्रतिनिधी : भारतीय हवाई दलातील माजी हवाई योद्धा, ग्रुप कॅप्टन श्रीकांत बाळकृष्णराव वालवडकर (निवृत्त) यांनी १ जून २०२६ रोजी शिवाजी विद्यापीठातून मानवविज्ञान विद्याशाखेतून इंग्रजी विषयातील पीएच.डी. पदवी संपादन केली. शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त करणारे ते पहिले हवाई योद्धा ठरले आहेत. (Shivaji University awards PhD to Air Force warrior)

शिवाजी विद्यापीठाने ऑक्टोबर २०२४ मध्ये भारतीय हवाई दलासोबत सामंजस्य करार  केला आहे. या करारांतर्गत सेवेत असलेल्या इच्छुक हवाई योद्ध्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा शिवाजी विद्यापीठामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे देशसेवेबरोबरच शिक्षण घेण्याचीही संधी हवाई दलातील जवानांना मिळत आहे.

जवानांच्या शैक्षणिक उत्थानासाठी महत्त्वाचा असलेल्या या उपक्रमाचा लाभ भारतीय हवाई दलातील निवृत्त ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर यांनी घेण्याचे ठरवून इंग्रजी या विषयामध्ये पीएच.डी. संपादन केली.  शिवाजी विद्यापीठातून ह्युमॅनिटीज या क्षेत्रातील इंग्रजी विषयातील पीएच.डी. पदवी संपादन करून या उपक्रमाचा लाभ घेतला.  ‘इंडियन मिलीटरी ऑपरेशन्स – परसेप्शन अँड प्रेझेंटेशन इन सिलेक्टेड वॉर नॉन फिक्शन्स अँड वॉर मूव्हीज’ या विषयावर त्यांनी विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केला. त्यांना डॉ. तृप्ती करेकट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. श्रीकांत वालवडकर यांनी हवाई दलात २७ वर्षे लढाऊ सैनिक अधिकारी (Combatant) म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली असून ३१ डिसेंबर २००९ रोजी स्वेच्छानिवृत्ती (Voluntary Retirement) स्वीकारली आहे. (Shivaji University awards PhD to Air Force warrior)

देशसेवेनंतर शिक्षण क्षेत्रातही कॅप्टन वालवडकर यांनी मिळविलेले उल्लेखनीय यश सेवारत तसेच निवृत्त सैनिकांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत.  कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी त्यांचे अभिनंदन केले. भारतीय वायू दल आणि शिवाजी विद्यापीठाच्या या उपक्रमाचा वायु सेना अधिकारी आणि सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. कामत यांनी आज ग्रुप कॅप्टन वालवडकर यांचे अभिनंदन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह डॉ. तृप्ती करेकट्टी, सौ. वालवडकर उपस्थित होत्या. (Shivaji University awards PhD to Air Force warrior)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!