Home » Blog » ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांचे निधन

by प्रतिनिधी
0 comments
Journalist Uday Kulkarni has passed away

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी  (वय ७४) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. नुकतेच त्यांनी ‘खळाळ’ हे आत्मचरित्र लिहून पूर्ण केले होते. प्रकाशन सोहळा पुढील आठवड्यात होणार असतानाच त्यांचे निधन कोल्हापूरच्या पत्रकार जगताला चटका लावून गेले आहे. (Journalist Uday Kulkarni has passed away)

दैनिक केसरी मधून त्यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली. साहित्य, चित्रपट, नाटक आणि सामाजिक चळवळीचे ते गाढे अभ्यासक होते. अनेक वृत्तपत्रे आणि नियतकालिकामधून त्यांनी लिखान केले. पत्रकारिता करत असताना त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांचा पिंडही कायम जपला होता. पर्यावरण चळवळीत ते हिरिरीने भाग घेत. रंकाळा बचाव, पंचगंगा नदी प्रदूषण, बॉक्साईड उत्खनन, पश्चिम घाट जैवविविधता, विज्ञान प्रबोधनी, विज्ञान यात्रा या चळवळीत त्यांचा मोलाचा वाटा होता. नर्मदा बचाव आंदोलनात मेधा पाटकरासमवेत ते सहभागी झाले होते. (Journalist Uday Kulkarni has passed away)

ते कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असताना समाजातील घडामोडीवर सोशल मिडियावर अखेरपर्यंत व्यक्त होत असत. पत्रकार अश्विनी टेंबे यांनी अखेरच्या काळात त्यांचे आत्मचरित्र शब्दबद्ध केले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही होणार होता. खळाळ या आत्मचरित्राचे मुख्यपृष्ठ असलेली पोस्टही आज करण्यात आली होती. पण आज दुपारीच त्यांच्या निधनाची वार्ता समजताच हळहळ व्यक्त केली जात आहे. (Journalist Uday Kulkarni has passed away)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!