Home » Blog » पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे

पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे

by प्रतिनिधी
0 comments
Panchganga River approaching the warning level

कोल्हापूर : प्रतिनिधी : धरणे भरली नसतानाही धरण क्षेत्रात पडलेल्या तुफान पावसामुळे पंचगंगा नदीची वाटचार इशारा पातळीकडे चालली आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी ३४ फुटांवर होती. इशारा पातळी ३९ फूट इतकी आहे. पुढील २४ ते ४८ पासात मुसळधार पाऊस झाला तर इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तवली आहे. पाटगांव धरणक्षेत्रात २५६ मिलीमीटर तर दूधगंगा धरणक्षेत्रात २१२, सर्फनाला धरणक्षेत्रात २४९ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.  महापुराची शक्यता लक्षात घेता एनडीआरएफच्या दोन तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.

जिल्ह्यात तीन जुलैपासून पासून पावसाची संततधार सुरू आहे. रोज सरासरी ५० मिमी पावसाची नोंद होत असून पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत दर २४ तासांत सुमारे ६ ते ७ फुटांनी वाढ होत आहे. डोंगरमाथा परिसरातील पावसाचे पाणी अद्याप नदीपात्रात येत असून घाटमाथ्यावर सुरू असलेली अतिवृष्टी लक्षात घेता पुढील २४ ते ४८ तासांत पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी आपत्कालीन प्रतिसादासाठी पूर्ण सज्ज राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे. जिल्हाधिकारी राठोड यांनी तातडीची आपत्ती कक्षाशी संबधित सर्व विभागांची बैठक घेऊन २४ तास अलर्ट राहण्याचे आदेश सर्व विभागांना दिले. (Panchganga River approaching the warning level)

४४ बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, हळदी,खडक कोगे व राशिवडे,  तुळशी नदीवरील- कसबा बीड व आरे,  कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगांव, वालोली, कांटे व पेंडाखळे, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, सांगरुळ, मांडुकली,  वारणा नदीवरील- कोडोली व मांगलेसावर्डे, दूधगंगा नदीवरील-  दत्तवाड व सिध्दनेर्ली, वेंदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापुर, सुरुपली, गारगोटी, म्हसवे, करडवाडी व शेणगाव, हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव व घटप्रभा नदीवरील- कानडे- सावर्डे असे एकूण ४४ बंधारे पाण्याखाली आहेत. (Panchganga River approaching the warning level)

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा

जिल्ह्यातील राधानगरी 3.15 टीएमसी, तुळशी 1.34 टीएमसी, वारणा 7.71 टीएमसी, दूधगंगा 3.13 टीएमसी, कासारी 1.05 टीएमसी, कडवी 1.01 टीएमसी, कुंभी 1.11 टीएमसी, पाटगाव 1.44 टीएमसी, चिकोत्रा 0.53 टीएमसी, चित्री 0.63 टीएमसी, जंगमहट्टी 0.49 टीएमसी, घटप्रभा 1.55 टीएमसी, जांबरे 0.57 टीएमसी, आंबेआहोळ 0.69 टीएमसी, सर्फनाला 0.39 टीएमसी, धामणी 1.05 व कोदे ल.पा. 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील तालुकावर सरासरी पाऊस

जिल्ह्यात मागील 24 तासांत एकूण सरासरी 52.34 मि.मी. पर्जन्यमान नोंदविण्यात आले. तालुकानिहाय पर्जन्यमानामध्ये गगनबावडा (101.3 मि.मी.) येथे सर्वाधिक पाऊस झाला असून, त्यापाठोपाठ – हातकणंगले- 16 मिमी, शिरोळ -12.4 मिमी, पन्हाळा- 59.6 मिमी, शाहुवाडी- 87 मिमी, राधानगरी- 65.7 मिमी, गगनबावडा- 101.3 मिमी, करवीर- 54.8 मिमी, कागल- 43.3 मिमी, गडहिंग्लज- 36.6 मिमी, भुदरगड- 38.4 मिमी, आजरा- 51.3 मिमी, चंदगड- 61.7 मिमी, असा एकूण 52.34 मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. (Panchganga River approaching the warning level)

धरणक्षेत्रातील पाऊस असा

 राधानगरी २०२ मिली मीटर, तुळशी १९८, वारणा १२८, दूधगंगा २१३, कासारी १५०, कडवी १६६, कुंभी १६९, पाटगांव २५६, चिकोत्रा १५७, चित्री १६०, जंगमहट्टी १३६, घटप्रभा १३५, जांबरे १८५, आंबेओहोळ ९०, सर्फनाला २४९, धामणी ८८, कोदे १७८.  

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00