Home » Blog » गोकुळच्या निवडणुकीत बिनआवाजाचा बॉम्ब फुटणार : सतेज पाटील

गोकुळच्या निवडणुकीत बिनआवाजाचा बॉम्ब फुटणार : सतेज पाटील

by प्रतिनिधी
0 comments
Satej Patil’s show of strength for the Gokul election

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मिडियाशी बोलताना गोकुळच्या निवडणुकीला अजुन दोन महिने अवकाश असून या काळात बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी पत्रकारांशी बोलताना गोकुळ निवडणुकीसाठी बिनविरोधचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. तो आल्याशिवाय बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. परंतु गोकुळ टिकला पाहिजे यासाठी ज्या भूमिका घ्याव्या त्या निश्चितपणे घेऊ असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. (Satej Patil’s show of strength for the Gokul election)

आमच्या समविचारी आघाडीने जिल्ह्यातील १८५१ ठराव दाखल केले असून दूध उत्पादक आमच्या बाजुने आम्हाला न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमची राजर्षी शाहू समविचारी आघाडी असून जे आमच्यासोबत येतील त्यांना घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.

शक्तीप्रदर्शनाने १८५१ ठराव दाखल

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या निवडणुकीसाठी ठराव करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेले आठवडाभर आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने तर मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रचंड शक्तीप्रदर्शन करत गोकुळच्या निवडणुकीसाठी ठराव दाखल केले. आज आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, राजीव आवळे दत्त सहकार समुहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपदर्शन करत १८५१ ठराव दाखल करुन महायुतीला ताकद दाखवली. (Satej Patil’s show of strength for the Gokul election)

गोकुळच्या सातबाऱ्यावर दूध उत्पादकाचे नाव राहण्यासाठी लढा

स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर साहेबांनी उभारलेला गोकुळचा वारसा पुढे नेण्याची आमची बांधिलकी आहे. आमची लढाई सत्तेसाठी नसून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय, प्रतिष्ठा आणि त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आहे. आम्ही मल्टिस्टेटचा प्रयत्न हाणून पाडला, त्यामुळेच गोकुळच्या सातबाऱ्यावर दूध उत्पादकांचे नाव कायम राहिले. शेतकरी आणि दूध उत्पादक संस्था हा गोकुळचा पाया असून त्यांना वाचवण्यासाठीच आमचा लढा सुरू आहे. अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.

जिल्ह्यातील नेते रॅलीत सहभागी

यावेळी गोपाळराव पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील मुरगुडकर, रामराजे कुपेकर, सत्यजित जाधव, राहुल देसाई, हिंदुराव चौगले,  गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, शशिकांत पाटील- चुयेकर, बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर,  ए. डी. पाटील, सदाशिव चरापले,  एम. आर. पाटील- कुरुकलीकर, उदय पाटील, दिनकरराव कांबळे, उदयानी साळुंखे, स्मिता गवळी, बजरंग पाटील, शामराव देसाई, संभाजीराव देसाई, दगडू गावडे, दयानंद पाटील, प्रशांत देसाई, निवास पाटील, भगवानराव जाधव, रामकृष्ण पाटील, रणधीर मोरे, छाया देसाई, एकनाथ पाटील, सचिन घोरपडे, जीवन पाटील, विक्रम चव्हाण- पाटील, विद्याधर गुरबे, गणपतराव डोंगरे, अमर पाटील, महेश पाटील- शिंगणापूरकर, शशिकांत खवरे, सम्राट मोरे, प्रकाशराव पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, विरोधी पक्षनेता राजू लाटकर, गटनेता इंद्रजीत बोंद्रे, मधुकर रामाणे, सर्व जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक व आजी- माजी पदाधिकारी आणि ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Satej Patil’s show of strength for the Gokul election)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00