Home » Blog » ठाकरे शिवसेनेत फूट? सहा खासदारांचा वेगळा गट

ठाकरे शिवसेनेत फूट? सहा खासदारांचा वेगळा गट

by प्रतिनिधी
0 comments
Split in the Thackeray-led Shiv Sena

मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यामुळे देशासह महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सहा जणांच्या खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मान्यता दिली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने गुरुवारी सकाळी अकरा वाजता बैठकीला उपस्थित राहण्यासाठी खासदारांना व्हिप बजावला आहे. त्यामुळे सहा खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार राहणार असून पुन्हा हा चेंडू सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Split in the Thackeray-led Shiv Sena)

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन टायगर ही मोहिम गेली काही वर्षे सुरू आहे. या मोहिमेला आज बुधवारी मुर्त स्वरुप आल्याचा दावा केला जात आहे. ठाकरे गटाचे संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, संजय हरिभाऊ जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख यवतमाळ आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटातून लोकसभेत स्वतंत्र गट केला आहे. ठाकरे गटानेही गटाला मान्यता देऊ नका असे पत्रक लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना दिले आहे. सहा खासदारांच्या गटाचे जे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले आहे त्यावर संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर यांची स्वाक्षरी केली नसल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान सहा खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. हा गट शिवसेना शिंदे गटात विलिन होणार असून शिवसेनेच्या वर्धापनदिन सहा खासदार शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती सुत्राकडून दिली जात आहे.

लोकसभेत शिवसेनेचे नऊ खासदार होते. त्यापैकी सहा खासदार फुटल्याची चर्चा असून ठाकरे गटाकडे अरविंद सावंत, राजाभाऊ वाझे, अनिल देसाई हे तीनच खासदार शिल्लक राहिले आहेत. (Split in the Thackeray-led Shiv Sena)

खासदारकीचा राजीनामा देऊन जावा

शिवसेना ठाकरे गटाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, बंडखोरी करणारे शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांना बेईमानी करण्याचा अधिकार नाही. तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही खासदारकीचा राजीनामा देऊन जा असा इशाराही दिला.

महायुतीत शिवसेना मोठा भाऊ…

शिवसेनेचे सहा खासदार फुटून शिवसेना शिंदे गटात जाणार आहेत. शिंदे गटाचे सात आणि ठाकरे गटाचे सहा असे मिळून खासदारांची संख्या १३ झाली आहे. तर महाराष्ट्रातून भाजपचे नऊ खासदार निवडून गेले आहेत. शिवसेना खासदारांची संख्या १३ झाल्याने शिंदे गट मोठा भाऊ ठरला आहे. (Split in the Thackeray-led Shiv Sena)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00