Home » Blog » IPL Suspended : आयपीएल एक आठवडा स्थगित

IPL Suspended : आयपीएल एक आठवडा स्थगित

भारत-पाक तणावाच्या स्थितीवर पुढील निर्णय अवंबून

0 comments
IPL Suspended

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. एका आठवड्यानंतर दोन्ही देशांमधील तणावाचा आढावा घेऊन आयपीएलच्या वेळापत्रकाबाबत पुढील निर्णय जाहीर करण्यात येईल. (IPL Suspended)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया यांनी शुक्रवारी पत्रक प्रसिद्ध करून याविषयी माहिती दिली. बहुतांश संघांतर्फे खेळाडूंच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या नियामक समितीने सर्व संबंधितांशी चर्चा करून स्थगितीचा निर्णय घेतला. भारतीय सैन्यदलाच्या तयारीवर बीसीसीआयचा पूर्ण विश्वास असून आयपीएल स्थगितीचा निर्णय सर्वांच्याच हिताचा ठरेल, असे बीसीसीआयला वाटते, असे सैकिया यांच्या पत्रकात म्हटले आहे. (IPL Suspended)

गुरुवारी धरमशाला येथील पंजाब किंग्ज-दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना ब्लॅकआउटमुळे अर्ध्यातून रद्द करण्यात आला. रविवारचा चंडीगडला नियोजित पंजाब किंग्ज-मुंबई इंडियन्स यांच्यातील सामनाही अहमदाबादला हलवण्यात आला होता. तथापि, प्राप्त परिस्थितीत खेळाडू व सहायक वर्गाचा हवाई प्रवासाचे नियोजन, तसेच स्टेडियमवरील सुरक्षितता कठीण असल्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्थगित करण्यात आले. यंदाच्या आयपीएल मोसमातील आतापर्यंत ५८ सामने झाले आहेत. साखळीतील १२ सामने, तीन प्ले-ऑफ लढती आणि अंतिम सामना असे एकूण १६ सामने अद्याप बाकी आहेत. एका आठवड्यामध्ये परिस्थिती न निवळल्यास या सामन्यांचे आयोजन या वर्षी कोणत्या महिन्यात करता येऊ शकेल, याचेही अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. (IPL Suspended)

भारतीय संघ जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याहून परतल्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारतीय संघाचा बांगलादेश दौरा, तसेच आशिया कप टी-२० स्पर्धा नियोजित आहे. यांपैकी बांगलादेश दौरा रद्द करून त्याऐवजी आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्याचा विचार केला जाऊ शकतो. दरम्यान, आयपीएल स्थगित झाल्यानंतर परदेशी खेळाडू आपापल्या देशांत परतण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा :
रबाडाला खेळण्यास परवानगी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00