नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध पेटले असून अमेरिकेने एका व्यापारी जहाजावर हल्ला केला. या हल्ल्यात जहाजावरील दोन भारतीय खलाशी ठार झाले. मुख्य अभियंता बेपत्ता आहे. २४ भारतीय खलाशांना वाचवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. भारताने अमेरिकेच्या दुतावासाकडे अधिकृत निषेध नोंदवला आहे.
सेट्टेबेलो जहाजावर २४ भारतीय खलाशी
बुधवारी ओमानच्या किनाऱ्यावर पलाऊचा ध्वज असलेल्या सेट्टेबेलो जहाजावर २४ भारतीय खलाशी होते. अमेरिकेन या जहाजावर अचूक हल्ला केला. त्यामध्ये तीन प्रवाशी बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले.हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि आंध्र पदेशातील हे खलाशी आहेत. पण त्याचा मृत्यू झाला आहे. ओमानच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने २१ खलाशांची सुटका करण्यात आली आहे. (Two Indian sailors killed in a US attack)
भारताकडून हल्ल्याचा निषेध
या घटनेचा भारताने निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नागराज नायडू यांनी अमेरिकेचे चार्ज डी अफेअर्स जेसन मीक्स यांना बोलावून गेल्या काही दिवसात अमेरिका सैन्याने अनेक भारतीय खलाशी असलेल्या एका मालवाहू जहाजावर केलेल्या दुसऱ्या हल्ल्याचा निषेध करणारा औपचारिक निषेध नोंदवला.या प्रदेशात जहाजांवरील हल्ल्यांच्या सततच्या घटना अत्यंत चिंताजनक असल्याचे कळवले आहे. (Two Indian sailors killed in a US attack)
जहाजावर भारतीय खलाशी असल्याची अमेरिकेला माहिती
एफएसयूआयचे महासचिव मनोज यादव म्हणाले, जहाजासोबतचा संपर्क खंडीत झाल्याने सर्व तपशिलांची पडताळणी करणे अवघड झाले आहे. आम्हाला जहाजाशी संपर्क साधता आला नाही असे यादव यांनी एएनआयला सांगितले. माझ्याकडे आलेल्या ताज्या माहितीनुसार दोघांचा मृत्यू झाला असून मुख्य अभियंता अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. जहाजावर लष्करी कारवाई करण्यापूर्वी पर्यायी उपाययोजना करता आल्या असता का असा प्रश्न यादव यांना विचारला असता ते म्हणाले, जहाजावर कोणत्या देशाचे लोक आहेत याची माहिती अमेरिका अधिकाऱ्यांना असण्याची दाट शक्यता आहे. जहाजांवर नेमके किती भारतीय आणि परदेशी नागरिक होते हे अमेरिकन नौदलाला माहित होता असा दावाही यादव यांनी केला. (Two Indian sailors killed in a US attack)