Home » Blog » सैन्यदलाचा अपमान करणाऱ्या गिरीष महाजनांची हकालपट्टी करा : हर्षवर्धन सपकाळ

सैन्यदलाचा अपमान करणाऱ्या गिरीष महाजनांची हकालपट्टी करा : हर्षवर्धन सपकाळ

by प्रतिनिधी
0 comments
Mahajan's statement regarding Operation Blue Star

जमीर काझी :  मुंबई  : भाजप नेते व मंत्री गिरीष महाजन यांनी अमृतसर येथे ऑपरेशन ब्ल्यू स्टार संदर्भात केलेले वक्तव्य अत्यंत बेजबाबदार, राष्ट्रहिताला बाधा आणणारे आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा अवमान करणारे आहे.  देशविरोधी भूमिका घेणाऱ्या गिरीष महाजन यांची तात्काळ मंत्रिमंडळातून व भाजप पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी  प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. (Mahajan’s statement regarding Operation Blue Star)

ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही कोणत्याही धर्माविरोधातील कारवाई नव्हती, तर भारताचे तुकडे करण्याचे कारस्थान रचणाऱ्या सशस्त्र खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्यदलाने राबविलेली अत्यंत कठीण आणि आवश्यक मोहीम होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची पूर्ण जाणीव असतानाही देशाच्या एकता व अखंडतेला प्राधान्य देत हा कठोर निर्णय घेतला होता. त्यानंतर खलिस्तानी अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली. या मोहिमेचे नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांनाही दहशतवाद्यांनी लक्ष्य करून त्यांची हत्या केली. देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वांच्या त्यागाचा अवमान करण्याचे काम गिरीष महाजन करत आहेत, असे सांगून सपकाळ यांनी  महाजन यांच्या विधानाने भाजप  व रा. स्व. संघाची राष्ट्रविघातक प्रवृत्ती समोर आली आहे, अशी टीका केली. (Mahajan’s statement regarding Operation Blue Star)

 इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार राबविले नसते तर देशाचे तुकडे पडले असते, देशाच्या अखंडतेसाठी इंदिराजी यांना बलिदान द्यावे लागले त्यावरही महाजन शंका उपस्थित करतात हे अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे. विशेष म्हणजे देशाचे विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील या कारवाईशी संबंधित सुरक्षा मोहिमांमध्ये सहभागी होते. मग  महाजन त्यांच्या भूमिकेचाही निषेध करणार आहेत का? त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरून हकालपट्टी करण्याची त्यांच्यात  हिंमत आहे का, असा सवाल सपकाळ यांनी केला. (Sapkal criticizes Mahajan.)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00