Home » Blog » Raut : भाजपने  इंदिरा गांधींचा इतिहास बघावा

Raut : भाजपने  इंदिरा गांधींचा इतिहास बघावा

संजय राऊत यांचा हल्लाबोल

0 comments
Raut

जमीर काझी : मुंबई : पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंद करणे, हायकमिशन मधला स्टाफ कमी केला,  याला बदला घेणं म्हणतात का?,  भाजपने इंदिरा गांधींचा इतिहास बघावा, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी रविवारी केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले. (Raut)

 पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याला च्या घटनेला बारा दिवस उलटून गेले मात्र अद्यापही भारताकडून चोख प्रत्यूत्तर देण्यात आलेले नाही. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत खासदार राऊत म्हणाले,  दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात आमचे २७ लोक मारले गेले. मात्र अद्याप बदला काय घेतला? रोज बातम्या येतात, या नाड्या आवळल्या, त्या नाड्या सोडल्या,  २१ पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंद केले, पाकिस्तानच्या  हाय कमिशन मधला स्टाफ, कर्मचारीवर्ग कमी केला,  याला बदला घेणं म्हणतात का?  तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता, त्यांचे पक्ष फोडता, त्यांना तुरूंगात टाकता, त्यांचे आयुष्य उद्धवस्त करता.  त्यांच्या कुटुंबाचा छळ करता.  तसे पाकिस्तानच्या बाबतीत कधी करणार ?असा सवाल त्यांनी उपस्थित करून ते म्हणाले, ‘ बदला कसा पाहिजे हे बघण्यासाठीभाजपाने इंदिरा गांधींचा इतिहास बघावा. (Raut)

प्रधानमंत्री इकडून तिकडे, तिकडून इकडे फिरत आहेत. लोकांना मिठ्या मारत आहेत. याला बदला घेणं म्हणत नाही. भीती वाटते मला या देशाची. आता अशा प्रकारचे राज्यकर्ते या देशात असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय? तर  पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंद करायचे? असा  हल्ला चढवित राऊत म्हणाले,’.सरकार आणि भाजप हे फक्त विरोधकांना चुन चुन कर मारण्याचा प्रयत्न करत आहेत. तेही आता शक्य नाही. बारा दिवस झाले तरी हे बदला घेत आहेत आणि आता हे युद्ध सराव करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. (Raut)

अजित पवार खमक्या अर्थमंत्री

लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे. असे सांगत राऊत म्हणाले की, १५०० वरून ५०० वर आले आहेत. प्रचारात २१०० रुपये देण्याचे बोलले होते. अजित पवार बोलत होते मी नाही बोललो?, कर्जमाफी मी कुठे बोललो?, मात्र सरकार तुमचे आहे,  तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. प्रत्येक मंत्री बोलत आहे माझा पैसा, माझा पैसा. यात तुमचा पैसा कुठला? एक मंत्री  माझ्या खात्याचा पैसा वळवला आणि  बहिणींना दिला, असे सांगत आहेत .मात्र तो पैसा सरकारी होता.  तुमच्या खिशातला नाही , अशी टीका  मंत्री संजय शिरसाट यांच्यावर करीत राऊत म्हणाले,’ तुमचे जे सामाजिक विभागाचे जे कार्य आहे त्याची फसवणूक करत आहात. चोऱ्यामाऱ्या लांड्यालबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकीट मारी केली होती.  आणि आता ही पाकीट मारी करणे सोपं नाही. अजितदादा एक अर्थमंत्री म्हणून खामक्या माणूस आहे. आम्ही ते पाहिलेले आहे, असेही त्यांनी  सांगितले . (Raut)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00