Home » Blog » इबोला म्हणजे काय? कोणती खबरदारी घेण्याची आवश्यकता?

इबोला म्हणजे काय? कोणती खबरदारी घेण्याची आवश्यकता?

इबोला प्रभावित देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी भारताचा सतर्कतेचा इशारा

0 comments

नवी दिल्ली : आफ्रिकेतील इबोला विषाणूजन्य आजाराने (EVD) प्रभावित देशांमधून भारतात येणाऱ्या किंवा त्या देशांना भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी भारत सरकारने २१ मे २०२६ रोजी विशेष दिशादर्शक सूचना जारी केली आहे. (What is Ebola?)

युगांडा आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) येथे दुर्मीळ ‘बुंडिबुग्यो’ प्रकारच्या इबोला विषाणूचा मोठा उद्रेक झाला आहे. या उद्रेकात ६५० हून अधिक लोक संक्रमित झाले असून जवळपास १४४ जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभार्य लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

भारतामध्ये अद्याप एकही इबोलाचा रुग्ण आढळलेला नसला, तरी २०१९ पासून भारतीय आरोग्य यंत्रणांनी या झूनॉटिक आजाराची गंभीर दखल घेतली होती. भारताने इबोलाला देशासमोरील भविष्यात उद्भवू शकणाऱ्या प्रमुख विषाणूजन्य धोक्यांपैकी एक म्हणून वर्गीकृत केले आहे. (What is Ebola?)

दरम्यान, २८ मेपासून दिल्लीमध्ये होणारी भारत-आफ्रिका फोरम शिखर परिषदही बदलत्या आरोग्यस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच काँगोमध्ये फुटबॉलपटूंसाठी आयोजित प्री-वर्ल्ड कप प्रशिक्षण शिबिरही रद्द करण्यात आले आहे.

वटवाघुळांमधून पसरणारा आजार (What is Ebola?)

इबोला हा प्रामुख्याने वटवाघुळांमधून पसरणारा विषाणूजन्य आजार असून तो अनेकदा प्राणघातक ठरतो. संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्यांच्या शारीरिक द्रवांद्वारे तसेच दूषित वस्तूंमधून त्याचा संसर्ग होतो. काही दुर्मीळ प्रसंगी हा विषाणू हवेमार्फत पसरण्याची शक्यताही नोंदवली गेली आहे. (What is Ebola?)

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, इबोलाचा सरासरी मृत्यूदर सुमारे ५० टक्के आहे. पूर्वीच्या विविध उद्रेकांमध्ये हा दर २५ ते ९० टक्क्यांदरम्यान राहिला आहे.

भारताकडून आधीच सतर्कता

‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’मध्ये २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या Emerging / re-emerging viral diseases & new viruses on the Indian horizon या लेखात इबोलाला जैवसुरक्षा-जोखीम गट ४ मध्ये ठेवण्यात आले होते. म्हणजेच प्रयोगशाळांमध्ये या विषाणूवर काम करण्यासाठी अत्युच्च स्तरावरील सुरक्षा आवश्यक असते.

या लेखात इबोलासोबत MERS-CoV आणि बर्ड फ्लूसारख्या उच्च-जोखीम विषाणूंचाही उल्लेख करण्यात आला होता. तसेच आणि भारतात सतत देखरेख व तयारीची गरज अधोरेखित करण्यात आली होती. (What is Ebola?)

ऑक्टोबर २०२५ मध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) नेही इबोलाचा समावेश “भारतीय आरोग्य व्यवस्थेत तपासणीसाठी प्राधान्य असलेल्या रोगजंतूंमध्ये” केला होता.

ICMR ने म्हटले होते की अनेकदा आरोग्य प्रयोगशाळांमध्ये महत्त्वाचे आणि गंभीर रोगजंतू तपासणीच्या कक्षेबाहेर राहतात, ज्यामुळे रुग्णसेवा आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होतो.

दुर्मीळ पण धोकादायक रोगजंतू

ICMR ने इबोला आणि हंटाव्हायरसचा समावेश ‘प्रायोरिटी-३’ गटात केला आहे. या गटात अशा दुर्मीळ रोगजंतूंचा समावेश होतो, जे सामान्य तपासण्यांमध्ये आढळत नाहीत. शिवाय विशेष निरीक्षण कार्यक्रमांतर्गतच ओळखले जाऊ शकतात.

WHO नुसार, इबोला आजार ‘ऑर्थोइबोलाव्हायरस’ या विषाणू समूहामुळे होतो. त्याच्या सहा प्रकारांपैकी तीन प्रकार मोठ्या प्रमाणावर उद्रेक घडवून आणतात :

Ebola virus – इबोला विषाणूजन्य आजार

Sudan virus – सूदान विषाणूजन्य आजार

Bundibugyo virus – बुंडिबुग्यो विषाणूजन्य आजार

इबोलाची लक्षणे

इबोला झालेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीला : ताप, अशक्तपणा, स्नायूंमध्ये वेदना, डोकेदुखी, घसा खवखवणे अशी लक्षणे दिसतात.

यानंतर उलट्या, जुलाब, त्वचेवर पुरळ आणि काही प्रकरणांत रक्तस्त्राव ही गंभीर लक्षणे विकसित होऊ शकतात.

संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्यांच्या शारीरिक द्रवांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो.

इबोलाचा इतिहास

WHO च्या माहितीनुसार, इबोलाचा पहिला उद्रेक १९७६ मध्ये दोन ठिकाणी एकाच वेळी झाला होता. (What is Ebola?)

पहिला उद्रेक सध्याच्या दक्षिण सुदानमधील नझारा येथे झाला होता, तर दुसरा उद्रेक काँगोतील यांबुकू येथे झाला. यांबुकू हे गाव इबोला नदीजवळ असल्याने या रोगाला “इबोला” हे नाव देण्यात आले.

मे २०२६ मध्ये ‘एमव्ही होंडियस’ या मोहिमेवरील क्रूझ जहाजावर अँडीज हंटाव्हायरसचा बहुराष्ट्रीय उद्रेकही नोंदवण्यात आला होता.

WHO नुसार, या घटनेत २३ देशांतील प्रवाशांमध्ये ११ संभाव्य रुग्ण आढळले होते, ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला. संक्रमितांना विविध देशांतील विशेष वैद्यकीय केंद्रांमध्ये हलवण्यात आले होते.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00