Home » Blog » CRPF Jawan arrested: हेरगिरीप्रकरणी सीआरपीएफ जवानाला अटक

CRPF Jawan arrested: हेरगिरीप्रकरणी सीआरपीएफ जवानाला अटक

by प्रतिनिधी
0 comments
CRPF Jawan arrested

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी (२६ मे) सीआरपीएफ जवानाला अटक केली. मोती राम जाट असे त्याचे नाव आहे. पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली ही अटक केल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. (CRPF Jawan arrested)

एनआयएच्या मते, मोती राम २०२३ पासून हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी होता. त्याने पाकिस्तानी हँडलर्सना राष्ट्रीय सुरक्षेची गोपनीय माहिती शेअर केली होती.

एनआयएला असेही आढळून आले की, या  माहितीच्या बदल्यात त्याला विविध माध्यमातून पैसे मिळत होते. (CRPF Jawan arrested)

त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आणि सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

पटियाला हाऊस येथील विशेष न्यायालयासमोर त्याला उभे केले असता न्यायालयाने ६ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. (CRPF Jawan arrested)

पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतने ७ मे रोजी दहशतवादाविरोधात कडक पावले उचलली. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याच्या प्रत्यक्ष कारवाया करण्याबरोबरच दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे कामही तपास यंत्रणा करत आहेत. या  मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ही अटक करण्यात आली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ ज्ञात दहशतवादी पायाभूत सुविधा स्थळे उद्ध्वस्त केली. तेव्हापासून, तपास संस्थांनी हेरगिरीच्या आरोपाखाली अनेक व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. युट्युबर ज्योती मल्होत्रा तसेच गुजरातमधील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यालाही नुकतीच अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा :
मुंबई, बारामती, कोकणाला पावसाने झोडपले
 मुंबई, बारामती, कोकणाला पावसाने झोडपले

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00