Home » Blog » Covid : मुंबईत कोरोनाने दोन रुग्णांचा मृत्यू

Covid : मुंबईत कोरोनाने दोन रुग्णांचा मृत्यू

घाबरुन न जाण्याचे डॉक्टरांचे आवाहन

by प्रतिनिधी
0 comments
Covid

मुंबई : प्रतिनिधी :  मुंबईत दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दोन्ही रुग्णांना गंभीर आजार असल्याने ते अत्यवस्थ होते पण त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. (Covid)

कोविडने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरूवात केली असून हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोविडच्या साथीनंतर दर महिन्याला कोविडची सात ते आठ रुग्णांना उपचारासाठी दाखल होतात  पण ते बरे होऊन घरी परततात असे आरोग्य विभागाचे मत आहे. पण मुंबईतील केईम रुग्णालयात दोन कोविड रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याने हॉस्पिटल प्रशासन त्यावर लक्ष ठेऊन आहे. त्यातील एक रुग्णाचा मृत्यू कर्करोगाने तर दुसऱ्याचा किडनी आजाराने मृत्यू झाला. तथापी डॉक्टर आणि बीएमसी अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्यास सांगितले आहे आणि लोकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले आहे. (Covid)

केएमई रुग्णालयात परळ येथील ५९ वर्षीय महिलेचा कर्करोगाने मृत्यू झाला. रुग्णालयाने मृतदेह कुटुंबाला देण्यास नकार दिला. मृताच्या नातेवाईकांनी माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्याशी संपर्क साधला. कोकीळ यांनी हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर संबधित महिलेला कोविडची लागन झाल्याचे सांगितले. अनिल कोकीळ म्हणाले, महिलेला कर्करोग होता. तिचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. अशा परिस्थितीत रुग्णालयाने प्रोटोकॉलनुसार मृतदेह कुटुंबाला दिला नाही. कुटुंबातील दोन सदस्यांसह भोईवाडा स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले. (Covid)

दुसऱ्या एका प्रकारात किडनीच्या गंभीर आजाराने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. याही मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले की, दोन्ही रुग्णांच्या मृत्यूचे कारण इतर गंभीर आजार होते. लोकांनी घाबरुन जाऊ नये. या संदर्भात अधिक माहिती रुग्णालय प्रशासन आज प्रसारित करेल.

बीएमसीच्या कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले की नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. आम्ही कोविड प्रकरणांवर लक्ष ठेऊन आहेत. ऋतू बदलामुळे संसर्ग होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. परंतु रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. (Covid)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00