Home » Blog » मोदीकडून मेलोनीला मेलोडी चॉकलेटची भेट

मोदीकडून मेलोनीला मेलोडी चॉकलेटची भेट

by प्रतिनिधी
0 comments
Modi gifts Melody chocolates to Meloni

नवी दिल्ली : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलोडी चॉकलेटचे पॅकेट भेट दिले. मोदीच्या गिफ्टने भारावलेल्या मेलोनीनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहे.

पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर असून त्यांनी आखातातील देशाच्या भेटीनंतर युरोपमधील देशांना भेटी देत आहेत. नार्वे देशाला भेट देऊन मोदी आज बुधवारी इटलीला पोचले. इटलीची राजधानी रोम दौऱ्यात मोदींनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना मेलोडी चॉकलेटची भेट दिली. मेलोनी यांनी मेलोडी चॉकलेट गिफ्टचा व्हिडिओ ‘एक्स’ वर शेअर केला आहे. त्यामध्ये मेलोनी यांनी या भेटीबद्दल धन्यवाद अशी पोस्ट  केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मेलोनी म्हणाल्या ‘पंतप्रधान मोदींनी भेट म्हणून एक खूपच छान टॉफी आणली आहे’. (Modi gifts Melody chocolates to Meloni)

यापूर्वी मोदी आणि मेलोनी यांच्या भेटी झाल्या असून त्यांच्या भेटीवर मेलॉडी हा शब्द खूप लोकप्रिय झाला आहे. हा शब्द मोदी आणि मेलॉनी यांच्या आडनावांचे मिश्रण आहे. पाच देशांच्या दौऱ्यात मोदींचे रोममध्ये स्वागत करताना एक्स वर रोममध्ये आपले स्वागत आहे, माझ्या मित्रा अशी पोस्ट केली आहे. भारत आणि इटली यांच्या संबध दृढ करणे हा मोदींच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. दोन्ही देश व्यापार, सरंक्षण, तंत्रज्ञान, उर्जा, भारत-मध्य पूर्व युरोप आर्थिक कॅरिडॉर सारख्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांमध्ये सहकार्य करण्यावर चर्चा होणार आहे. (Modi gifts Melody chocolates to Meloni)

मोदी यांचे मंगळवारी इटली आममन झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी सायंकाळी कोलोसियममधून फेरफटका मारला. रात्रीच्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जेवण झाले. त्यानंतर प्रतिष्ठित कोलोसियमला भेट दिली. (Modi gifts Melody chocolates to Meloni)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00