Home » Blog » मातीपासून ताटापर्यंत प्लास्टिकचा प्रवास आरोग्यासाठी धोकादायक

मातीपासून ताटापर्यंत प्लास्टिकचा प्रवास आरोग्यासाठी धोकादायक

गहू-टोमॅटोच्या रोपांमध्ये प्लास्टिकचा शिरकाव होत असल्याचे संशोधनातून सिद्ध

by प्रतिनिधी
0 comments
  • ललित मौर्य

शेतीपासून थेट आपल्या ताटापर्यंत पोहोचणारे अन्न आता एका नव्या आणि अदृश्य धोक्याच्या छायेत आले आहे. नव्या वैज्ञानिक अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आली आहे. मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिक हे केवळ पिकांच्या वाढीवर परिणाम करत नाहीत, तर गहू आणि टोमॅटोसारख्या पिकांच्या मुळांपासून पानांपर्यंत आतमध्येही प्रवेश करू शकतात. (Plastic attacks on wheat and tomato plants)

ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ विद्यापीठाशी संबंधित संशोधकांनी प्रत्यक्ष शेतीसारख्या परिस्थितीत गहू आणि टोमॅटोच्या रोपट्यांवर हा अभ्यास केला.

मुळांमध्ये अडकले प्लास्टिक

अभ्यासात दिसून आले की प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण रोपट्यांची वाढ आणि क्लोरोफिलचे प्रमाण कमी करू शकतात. विशेषतः कपड्यांतून बाहेर पडणारे प्लास्टिकचे तंतुमय कण टोमॅटोच्या झाडांसाठी अधिक घातक ठरले. (Plastic attacks on wheat and tomato plants)

सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे मोठे मायक्रोप्लास्टिक कण मातीतील मुळांजवळ अडकून राहतात; पण नॅनोप्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण रोपटी शोषून घेतात. हे कण मुळांमधून खोड आणि पानांपर्यंत पोहोचतात. म्हणजेच मातीतील प्लास्टिक थेट आपल्या अन्नसाखळीचा भाग बनू शकते.

टोमॅटोवर मोठा परिणाम

अभ्यासानुसार गव्हाच्या तुलनेत टोमॅटोच्या पिकावर याचा परिणाम अधिक गंभीर दिसून आला. प्लास्टिकच्या जास्त संपर्कामुळे टोमॅटोच्या रोपट्यांची वाढ तब्बल ६७ टक्क्यांनी घटली. मुळांची लांबी ४७ टक्क्यांनी कमी झाली, तर वजनात ८२ टक्क्यांची घट नोंदवली गेली.

गव्हाची पिके तुलनेने कमी प्रभावित झाली; मात्र वाढत्या प्लास्टिक संपर्कामुळे त्यांच्या मुळांची एकूण लांबी ३९ टक्क्यांनी घटली. मुळांच्या बायोमासमध्ये ३१ टक्के घट आढळली.

तज्ज्ञांच्या मते, मुळे लहान झाल्यास रोपट्यांची पाणी आणि पोषक द्रव्ये शोषण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे वाढ आणि उत्पादनक्षमता दोन्हीवर परिणाम होतो.

कपड्यांतील प्लास्टिकचे तंतू धोकादायक

पॉलिस्टरसारख्या कृत्रिम कपड्यांतून बाहेर पडणारे सूक्ष्म प्लास्टिक तंतू मुळांभोवती गुंतून त्यांना जणू “जाम” करून टाकतात. त्यामुळे पाणी आणि पोषक द्रव्यांचा प्रवाह अडतो. परिणामी क्लोरोफिलचे प्रमाण घटते.

संशोधनात असेही दिसून आले की वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक कण एकत्र आल्यास त्यांचा दुष्परिणाम आणखी वाढतो. टोमॅटोमध्ये अशा मिश्रित प्लास्टिकमुळे वाढीत ४७ टक्क्यांपर्यंत घट झाली.

जुने प्लास्टिक अधिक घातक (Plastic attacks on wheat and tomato plants)

जुने, झिजलेले प्लास्टिक कण रोपट्यांत अधिक सहज प्रवेश करतात. कालांतराने प्लास्टिकच्या पृष्ठभागात बदल होतात आणि ते माती व मुळांना अधिक चिकटू लागतात. त्यामुळे त्यांचा परिणाम अधिक तीव्र होतो. (Plastic attacks on wheat and tomato plants)

या अभ्यासाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रयोगशाळेतील कृत्रिम परिस्थितीऐवजी प्रत्यक्ष शेतीतील परिस्थितीचा वापर करण्यात आला. संशोधकांनी आधी वापरलेले आणि झिजलेले प्लास्टिक कण वापरले. त्यांचे आकार आणि प्रमाणही प्रत्यक्ष शेतात किंवा जैविक खतामध्ये आढळणाऱ्या पातळीप्रमाणेच ठेवले गेले. त्यामुळे या निष्कर्षांना वास्तवाच्या अधिक जवळचे मानले जात आहे.

मातीमार्गे प्लास्टिकचा प्रवास

या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या शास्त्रज्ञ डॉ. शिमा जियाझाह्रोमी यांच्या मते, “शेतीची माती आता केवळ प्लास्टिकचा साठा राहिलेली नाही; ती प्लास्टिक अन्नसाखळीत पोहोचवण्याचा मार्ग बनत आहे.” (Plastic attacks on wheat and tomato plants)

त्यांनी इशारा दिला की वेळेत उपाययोजना न झाल्यास याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होऊ शकतो. त्यांच्या मते, प्लास्टिकच्या वाढत्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी व्यवस्थापन, प्रतिबंधात्मक उपाय आणि वैज्ञानिक आधारावरील कठोर नियमांची तातडीने गरज आहे.

आधीच्या संशोधनांतूनही इशारे

चीन, अमेरिका आणि जर्मनीतील संशोधकांच्या आणखी एका अभ्यासात मायक्रोप्लास्टिकमुळे जागतिक स्तरावर वनस्पतींची प्रकाशसंश्लेषण क्षमता १२ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते, असे समोर आले आहे.

शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार पुढील २५ वर्षांत मायक्रोप्लास्टिकमुळे मका, तांदूळ आणि गव्हाच्या उत्पादनात दरवर्षी ४.१ ते १३.५ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. यामुळे दरवर्षी सुमारे ३६.१ कोटी मेट्रिक टन अन्नधान्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. (Plastic attacks on wheat and tomato plants)

समुद्री अन्न उत्पादनावरही त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. प्रकाशसंश्लेषणात अडथळा निर्माण झाल्याने शैवालांची संख्या घटत असून त्यामुळे सी-फूड उत्पादनात ७.२४ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता संशोधनातून व्यक्त करण्यात आली आहे.

एफएओचाही इशारा Plastic attacks on wheat and tomato plants

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) देखील कृषी क्षेत्रातील प्लास्टिक वापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या अहवालानुसार, जागतिक कृषी पुरवठा साखळीत दरवर्षी सुमारे १.२५ कोटी टन प्लास्टिक वापरले जाते.

याशिवाय अन्नसाठवण आणि पॅकेजिंगसाठी दरवर्षी सुमारे ३.७३ कोटी टन प्लास्टिक वापरले जाते. मत्स्यपालन आणि एक्वाकल्चर क्षेत्रातही दरवर्षी सुमारे २१ लाख टन प्लास्टिकचा वापर होत आहे. (Plastic attacks on wheat and tomato plants)

एफएओनेही स्पष्ट केले आहे की हा वाढता प्लास्टिक वापर अन्नसुरक्षा, पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी मोठा धोका ठरत आहे.

एकूणच हा अभ्यास गंभीर इशारा देणारा आहे. प्लास्टिक जर पिकांच्या मुळांमध्ये साचून त्यांच्या वाढीला अडथळा आणत असेल आणि थेट वनस्पतींच्या आतपर्यंत पोहोचत असेल, तर भविष्यात अन्नसुरक्षा आणि आरोग्यासमोर मोठे संकट उभे राहू शकते. (Plastic attacks on wheat and tomato plants)

आता खरा प्रश्न असा आहे की शेतीत पोहोचणारे प्लास्टिक थांबवायचे कसे? कारण हा धोका शांतपणे, पण वेगाने वाढत आहे.

(सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या (सीएसई) `डाऊन टू अर्थ`च्या सौजन्याने)

microplastics penetrate wheat and tomato plants

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00