Home » Blog » निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयावर फडणवीसांचे आक्षेप

निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयावर फडणवीसांचे आक्षेप

by प्रतिनिधी
0 comments
Fadnavis objects to the decision to postpone the elections

मुंबई : प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २२ नगरपरिषद आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. या निर्णयाविरोधात विरोधकांनी टीका केली असताना सत्ताधाऱ्यांनीही टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. या निवडणुका रद्द करणे हे अत्यंत चुकीचे असल्याचा आक्षेप फडणवीसांनी घेतला आहे. (Fadnavis objects to the decision to postpone the elections )

मुख्यमंत्री फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. या निवडणुका रद्द करणे, हे अत्यंत चुकीचे आहे. म्हणजे यानंतर कोणीही कोर्टात जाईल आणि निवडणुका पुढे ढकलल्या जातील. आजअखेर असे कधीच झालेले नाही. कुठला कायदा निवडणूक आयोग काढत आहे? याबद्दल कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेत आहे, याची मला कल्पना नाही. पण जेवढा माझा कायद्यांचा अभ्यास आहे आणि मी काही वकिलांशी पण बोललो. अशापद्धतीने एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत.” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. “अनेक उमेदावारांची प्रचाराची मेहनत वाया गेली. निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचेच आहे. या आक्षेपांचे लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार आहे,” (Fadnavis objects to the decision to postpone the elections )

निवडणूक आयोगाने राज्यातील २२ नगरपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी उद्या मंगळवारी दोन डिसेंबर रोजी निवडणुका होणार होत्या. तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. आता २० डिसेंबरला मतदान तर २१ तारखेला मतमोजणी होणार आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या फलटण नगरपालिकेचीही निवडणूक पुढे गेली आहे. निवडणूका पुढे गेल्यानंतर राज्यात दोन डिसेंबरला होणाऱ्या निवडणूकीची मतमोजणीही एकदम २१ डिसेंबरला करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कारण तीन डिसेंबरला मतमोजणीही निकाल लागला तर पुढे गेलेल्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. (Fadnavis objects to the decision to postpone the elections )

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00