Home » Blog » मुख्यमंत्री स्टॅलिन पराभूत; थलपती विजयच्या टीव्हीकेची बाजी

मुख्यमंत्री स्टॅलिन पराभूत; थलपती विजयच्या टीव्हीकेची बाजी

0 comments
Chief Minister Stalin Defeated

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी डीएमके पक्षाला मोठा फटका बसला असून थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने बाजी मारली आहे. डीएमके पक्षाचे सर्वोसर्वा मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पराभवाचा धक्का बसला आहे. (Chief Minister Stalin Defeated)

कोलाथूर मतदारसंघामध्ये टीव्हीकेचे बाबू यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा ८५०० मतांनी पराभव केला. २३४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत टीव्हीकेने १०७ जागांवर आघाडी मिळवली आहे. तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाला बहुमतांसाठी ११७ जागा हव्या आहेत. हा पक्ष १०७ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस पक्षानेही टीव्हीकेला सरकार बनवण्यासाठी पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. काँग्रेस पक्ष हा डीएमकेचा मित्रपक्ष आहे. डीएमके ६० जागांवर आघाडीवर आहे. टीव्हीएकेने निवडणूक जाहीरनाम्यात महिलांना आठ ग्रॅम सोन्याचे आश्वासन दिले होते. (Chief Minister Stalin Defeated)

तामिळनाडून द्रमुक आणि अण्णा डीएमके या दोन पक्षांचे प्राबल्य होते. पण नव्याने स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने या दोन्ही पक्षांची मक्तेदारी मोडून काढली आहे. २३४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत टीव्हीएके १०२ जागांवर आघाडीवर आहे. डीएमके ५८ तर एआयडीएमके ५३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचे पाच उमेदवार आघाडीवर असून भाजपचा एकमेव उमेदवार आघाडीवर आहे. (Chief Minister Stalin Defeated)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00