मुंबई : प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वृत्तपत्रांना जाहीराती दिल्या आहेत. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक्स वर पोस्ट करुन भाजपला सवाल केला आहे.
भाजपने अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर श्रद्धांजलीची जाहीरात दिली आहे. त्यावर संजय राऊत यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे, भाजपने कमाल केली! दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या! त्याने काय होणार? अजित दादांवर भाजपा म्हणजेच पं.मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ७० हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल’ अशा शब्दात टीका केली आहे. अजित पवारांवर मोदी आणि फडणवीसांनी यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. (Sanjay Raut questions Modi and Fadnavis)
काल अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहण्यात आली. आज गुरुवारी अजित पवारांना अंतिम निरोप देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. (Sanjay Raut questions Modi and Fadnavis)