Home » Blog » प्रशांत जगताप यांचा राजीनामा

प्रशांत जगताप यांचा राजीनामा

by प्रतिनिधी
0 comments
Prashant Jagtap's resignation

पुणे : प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने पुरोगामी विचाराचे कट्टर समर्थक प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्षपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे राजीनामा सपुर्द केला आहे. प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. गेले दोन दिवस त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. आज त्यांनी राजीनामा देऊन पूर्णविराम दिला. राजीनाम्यानंतर जगताप कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. (Prashant Jagtap’s resignation)

प्रशांत जगताप म्हणाले, मी पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे. आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी शरद पवार यांचे मनापासून आभार मानतो. २७ वर्षांपूर्वी मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज २७ वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल. आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार, असे प्रशांत जगताप म्हणाले. (Prashant Jagtap’s resignation)

सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करण्याची मला संधी मिळाली. पक्षात खूप चांगल्या पद्धतीने मी कामकाज केले. हडपसर वानवडी परिसरातील नागरिकांनी मला दाद दिली. मी रस्तांवर उतरुन काम केले. हे मी पुणेकर यांच्यासाठी केले. त्यामुळे मी सर्वप्रथम शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आभार मानतो. (Prashant Jagtap’s resignation)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00