Home » Blog » Six dead in Kalyan: कल्याणमध्ये इमारत कोसळली; सहा जणांचा मृत्यू

Six dead in Kalyan: कल्याणमध्ये इमारत कोसळली; सहा जणांचा मृत्यू

मृतांमध्ये चार बालकांचा समावेश

by प्रतिनिधी
0 comments
Six dead in Kalyan

कल्याण : कल्याण येथे धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. पाठोपाठ दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळत गेले. (Six dead in Kalyan)

कल्याण पूर्व येथील चिकणीपाडा भागात मंगळवारी (२० मे) ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश आहे. चार जखमींवर पालिका आणि खासगी रूग्णालयांत उपचार सुरू आहेत.

चिकणीपाडा येथे श्री सप्तश्रृंगी इमारत आहे. तिचे बांधकाम सन २००६ मध्ये झाले आहे. ही इमारत चार मजल्याची आहे. ही इमारत गेल्या वर्षी पालिकेच्या जे प्रभागाने धोकादायक घोषित केली होती. चौथ्या मजल्यावर एका कुटुंबीयांकडून घरातील देखभाल दुरुस्ती सुरू होती. यावेळी या घरातील पृष्ठभागाचा स्लॅब अचानक कोसळला. तो तिसऱ्या, दुसऱ्या आणि पहिल्या माळ्यावर कोसळत गेला. काही कळायच्या आतच चार मजल्यांचे स्लॅब कोसळत गेले. या स्लॅबखाली दबून सहा जणांचा मृत्यू झाला. (Six dead in Kalyan)

जोराचा आवाज झाल्याने आजूबाजूचे लोक धावून आले. घरांमध्ये स्लॅब कोसळल्याने या घरांमध्ये जाणे अशक्य होते. त्यामुळे बचावासाठी धावलेल्या नागरिकांनी ही माहिती तत्काळ पालिका अग्निशमन दलाला दिली. (Six dead in Kalyan) पालिकेचे जे प्रभागाचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. आपत्कालीन पथकाला घटनास्थळी पाचारण करण्याचा निर्णय घेतला. तिन्ही दलाच्या पथकांनी युध्दपातळीवर बचाव कार्य सुरू केले. या इमारतीत अडकलेल्या रहिवाशांची सुटका केली. जखमींना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. इमारतीचा कोसळलेला भाग बाहेर काढण्याचे आणि बचाव कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00