कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जागा वाटपात एकमत झाले आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर यांच्यासह दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या चर्चेत हा निर्णय झाला.
शिवसेनेला बारा जागा देण्यात येणार आहेत. त्यापैकी सात जागावर एकमत झाले आहे. पाच जागांवर चर्चघ् सुरू आहे. दरम्यान शिवसेनेने एका स्वीकृत सदस्य नगरसेवकपदाची मागणीही केली आहे. (Shiv Sena Thackeray group got twelve seats)
आज बुधवारी आयोध्या हॉटेलमध्ये सतेज पाटील आणि अरुण दूधवडकर यांच्यात बैठक झाली. बैठकीला शिवसेनेचे उपनेते संजय पवार, आमदार जयंत आसगांवकर, सह संपर्क प्रम्ख विजय देवणे, शिवसेना जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना शहराध्यक्ष सुनील मोदी यांच्या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. (Shiv Sena Thackeray group got twelve seats)
बैठकीनंतर बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढणार आहे. शिवसेनेने पहिल्यांदा ३३ जांगाचा प्रस्ताव दिला. त्यानंतर दोन्ही पक्षांती स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या चार ते पाच् बैठका झाल्या. त्यानंतर शिवसेनेने १६ जागांची मागणी केली होती. दरम्यान जो उमेदवार सक्षम आहे, जिंकून येण्याची क्षमता आहे अशांना उमेदवार देण्यात येणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगतिले. (Shiv Sena Thackeray group got twelve seats)
शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि डाव्या पक्षांसोबतही चर्चा सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडी सक्षमपणे महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.