Home » Blog » फलटणच्या महिला डॉक्टरची  व्यवस्थेकडून हत्या;  विरोधकांचा हल्ला

फलटणच्या महिला डॉक्टरची  व्यवस्थेकडून हत्या;  विरोधकांचा हल्ला

by प्रतिनिधी
0 comments
Phaltan's female doctor murdered by the system

जमीर काझी : नागपूर : फलटण  उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांचे निधन ही आत्महत्या नसून, ती व्यवस्थेने केलेली हत्या आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यांनी ज्या लोकांची नावे घेतली आहेत, ज्यात भाजपचे काही नेते देखील सामील आहेत, त्या सर्वांवर निष्पक्षपणे कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी विरोधकाकडून विधानसभेत करण्यात आली.

 दरम्यान, या प्रकरणी महिला सखोल चौकशी करण्यात येत असून तत्कालीन पीएसआय गोपाळ बदने याच्याकडून छळ व फसवणूक झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे तपासातून पुढे आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याप्रकरणी विरोधकांकडून राजकारण करण्यात येत असल्याचा विरोधकांना टोला लगावला. (Phaltan’s female doctor murdered by the system)

याबाबत काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी वैद्यकीय,खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी शासन कोणती पाऊले उचलणार आहे, असा थेट सवालही सरकारला विचारला. डॉ. संपदा मुंडे एक हुशार आणि प्रामाणिक डॉक्टर होत्या; भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला असा आरोप केला. (Phaltan’s female doctor murdered by the system)

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर देताना या विषयाला राजकीय रंग देण्याचा आणि लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा खुद्द पीडितेने तुमच्या पक्षाच्या नेत्याचे नाव घेतले होते, त्यावेळी त्या नेत्याचे संरक्षण कोण करत होते? मुख्यमंत्री महोदय राजकारण तुम्ही करत आहात आम्ही नाही, असे सांगितले.

 त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तत्कालिन फौजदार गोपाळ बदने याच्या छळामुळे महिला डॉक्टर यांनी आत्महत्या केली.या दुर्दैवी घटनेबद्दल चौकशीसाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य शासन कटिबद्ध असून महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी ज्या-ज्या संबंधितांची नावे समोर आली त्यांची चौकशी करण्यात आली आहे. महिलेच्या सुसाईड नोटचे अक्षर हे त्या महिलेचे असल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी संबंधित महिला डॉक्टरचे शोषण व फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. या विषयी गुन्हा दाखल झाला असून गुन्हेगारांना अनफिट प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण होते. हे प्रकरण पाच महिन्यापूर्वीचे असून आत्महत्येविषयी आरोपींनी केलेली फसवणूक हे महत्त्वाचे कारण समोर आले आहे. तसेच आत्महत्येपूर्वी महिलेला भेटण्यास कोण कोण आले याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (Phaltan’s female doctor murdered by the system)

कोरेगाव पार्क, पुणे येथील विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरणीही सखोल चौकशी करण्यात येईल. केंद्र सरकारच्या नवीन तीन कायद्यामध्ये शक्ती कायद्यातील अनेक तरतुदींचा समावेश आहे. काही तरतुदी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करतात. या सर्व गोष्टीचा अभ्यास करून ज्या तरतुदी करावयाच्या आहेत या विषयी काम सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. विजय वडेट्टीवार,अमित साटम, प्रकाश सोळंके, ज्योती गायकवाड, सुनील प्रभू, नाना पटोले यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. (Phaltan’s female doctor murdered by the system)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00