Home » Blog » Thackeray’s criticism on money distribution : निवडणुकीत पैशांचा धूर : उद्धव ठाकरे

Thackeray’s criticism on money distribution : निवडणुकीत पैशांचा धूर : उद्धव ठाकरे

by प्रतिनिधी
0 comments
Thackeray's criticism on money distribution

मुंबई : प्रतिनिधी : नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत नेत्यांकडून भाषणात होत असलेले लक्ष्मीदर्शनाचा उल्लेख, निधींची घोषणा, तिजोरीच्या किल्ल्या यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात रोख वीस लाख रुपयांची बंडले सापडल्याने सत्ताधारी भाजप पक्ष निशाण्यावर आला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत पैशांचा धूर दिसतोय,  असा आरोप केला. (Thackeray’s criticism on money distribution)

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले की, महाराष्ट्रात पैशांचा वाटप, पैशांचा पाऊस किंवा अतिवृष्टी भयानक पद्धतीने सुरू आहे. सत्ताधारांना सत्तेचा माज, सत्तेजा दर्प चढल्याचे त्यांच्या वागणुकीतून दिसत आहे.  ज्याप्रकारे मी आठ-दहा दिवसांपूर्वी मराठवाड्यात शेतकऱ्यांसोबत जाऊन बसलो होतो, तेव्हा त्यांची दु:ख, वेदना आणि व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना धीर दिला. त्याप्रमाणे एकही मंत्री शेकऱ्यांसोबत जाऊन बसत नाही, नागरिकांशी बोलत नाही, मात्र निवडणुकीत लोकांच्या भेटी घेतल्या जात आहेत.  तिथे पैशांच्या थैल्या उघडल्या जात आहेत आणि मतं मागितली जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. (Thackeray’s criticism on money distribution)

उद्धव ठाकरे यांनी मुंबईत हवेचे प्रदुषण वाढले आहे असे मत व्यक्त करताना महायुतीवर टीका केली. “आमचा विकासाला विरोध नाही. आरेतील झाडे तोडली गेली, त्यामुळे प्रदुषणामध्ये वाढ झाली आहे. नियोजन शून्य विकासामुळे मुंबईत प्रदुषण वाढले आहे,” अशी टीका करत त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. तसेच, नाशिकमधील झाडे तोडण्यावरूनही त्यांनी टीका केली. “मुह मे राम, और बगल मे अदानी,” असे भाजपचे सुरु आहे, असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. आमचा विरोध हा कुंभमेळ्याला नाही, पण झाडांची कत्तल आम्हाला मान्य नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Thackeray’s criticism on money distribution)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00