Home » Blog » Rajesh Agarwal : राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश आगरवाल

Rajesh Agarwal : राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश आगरवाल

by प्रतिनिधी
0 comments
Rajesh Agarwal

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश आगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. ते जून २०२५ पासून या पदावर कार्यरत आहेत. त्यांना १५ महिन्याचा कालावधी मिळणार आहे. एक डिसेंबरपासून ते पदभार स्वीकारणार आहेत.

राजेश अगरवाल हे महाराष्ट्र केडरचे १९८९ बॅचचे सनदी अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी दिल्ली येथून कॉम्प्युटर सायन्समधून बी टेक ही पदवी घतेली आहे. त्यानंतर त्यांनी अकोला आणि जळगाव येथे जिल्हाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेत उपायुक्त, महाराष्ट्र वित्त आणि आयटी विभागांमध्ये प्रमुख भूमिका, केंद्रात आधार, जनधन, डिजी लॉकर आणि सामाजिक न्याय उपक्रमांवर काम केले आहे. अलीकडील राजेश अगरवाल यांनी केंद्रात अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभागात सचिव म्हणून काम केले आहे. डिजिटल प्रशासन कौशल्य, प्रशासकीय कौशल्य आणि सुधारणा-केंद्रित नेतृत्वासाठी ओळखले जाणारे राजेश अगरवाल हे  सोमवारी एक डिसेंबर  पासून महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. (Rajesh Agarwal)

दरम्यान, सुजाता सौनिक सेवानिवृत्त होणार होत्या, तेव्हा राजेशकुमार मीना यांच्यासोबतच राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, ओ. पी. गुप्ता आणि दीपक कपूर हेदेखील शर्यतीत होते. पण, प्रशासनात राजेशकुमार मीना हे सर्वात ज्येष्ठ असल्याने राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी सरकारकडून त्यांच्या नावालाच अधिक पसंती दिली होती. मात्र आता राजेश अगरवाल यांचा कार्यकाळ १५ महिन्यांचा असणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा इकबालसिंह चहल, भूषण गगराणी, ओ. पी. गुप्ता आणि दीपक कपूर यांची संधी हुकली आहे. (Rajesh Agarwal)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00