Home » Blog » South Africa All Out : दक्षिण अफ्रिकेचा डाव १५९ धावांवर आटोपला ; भारत १ बाद ३७

South Africa All Out : दक्षिण अफ्रिकेचा डाव १५९ धावांवर आटोपला ; भारत १ बाद ३७

by प्रतिनिधी
0 comments
South Africa All Out

कोलकोता : ईडन गार्डन्सवर पहिल्या कसोटी सामन्यात यजमान भारताने दक्षिण अफ्रिकेला पहिल्या डावात १५९ धावांवर गुंडाळले. सुरवातीला जयप्रित बुमराहने दिलेल्या धक्क्यांनी अफ्रिकेला सावरता आले नाही. बुमराहने भेदक मारा करताना पाच गडी बाद केले.  खराब प्रकाशामुळे खेळ थांबवला तेव्हा भारताने पहिल्या डावात एक बाद ३७ अशी धावसंख्या उभारली होती. केएल राहूल १३ धावांवर आणि वॉशिंग्टन सुंदर ६ धावांवर खेळत आहेत. (South Africa All Out)

दक्षिण अफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना त्यांच्या सलामीवर एडेन मार्कराम आणि रायन रिकेल्टनने पहिल्या गड्यासाठी ५७ धावांची भागिदारी केली. बुमराहने पहिला बळी मिळवला. त्याने रिकेलटनला २३ धावांवर बाद करत सलामीची जोडी फोडली. त्यानंतर उसळणाऱ्या चेंडूवर मार्कराम यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे झेल देऊन तंबूत परतला. दुसऱ्या बाजूने फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने दबाव वाढवला. त्याने कर्णधार टेम्बा बावुमाला तीन धावांवर बाद केले. तसेच वियान मुल्डरला २४ धावांवर बुमराहने पायचित केले. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू पाठोपाठ बाद झाले. जसप्रित बुमराहने २७ धावांत पाच गडी बाद केले. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलने एक गडी बाद केला. (South Africa All Out)

 दक्षिण अफ्रिकेचा डाव १५९ धावांवर संपुष्टात आल्यावर भारताने दमदार सुरुवात केली. यशस्वी जैस्वालने दोन चौकार मारले पण तो १२ धावावर बाद झाला. (South Africa All Out)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00