Home » Blog » राज्यात तीन दिवसांचा दुखवटा, आज शासकीय सुट्टी

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा, आज शासकीय सुट्टी

by प्रतिनिधी
0 comments
Three days of mourning in Maharashtra

मुंबई : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे.  तसेच आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने (राजशिष्टाचार) आदेश काढला आहे. आज बुधवारी सकाळी अजित पवारांचे बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. (Three days of mourning in Maharashtra)

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या अधिकृत पत्रात  उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या निधनामुळे त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तीन दिवस (२८ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६) शासकीय शोक पाळला जाईल.  या कालावधीत ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो, तिथे तो अर्ध्या काठीवर फडकवला जाईल.  या तीन दिवसांच्या कालावधीत कोणताही अधिकृत मनोरंजन किंवा करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. तसेच आज  शासकीय सुट्टीची घोषणा करण्यात आली. राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.  त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.  हे आदेश महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव ह. पं. बाविस्कर दिले आहेत.  (Three days of mourning in Maharashtra)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00