Home » Blog » Vasantdada : मुख्यमंत्र्यानी दिले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश

Vasantdada : मुख्यमंत्र्यानी दिले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश

by प्रतिनिधी
0 comments
Vasantdada

मुंबई : प्रतिनिधी : सहकार आणि ऊस संशोधन क्षेत्रातील राज्यातील महत्वाची संस्था म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ज्येष्ठ खासदार शरद पवार हे संस्थेचे अध्यक्ष असून राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार हे संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाने सहकार आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Vasantdada)

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला दिले जाणाऱ्या राज्य सरकारच्या अनुदान व्यवस्थित वापरले जातो की नाही याची चौकशी केली जाते. राज्यात होणाऱ्या ऊस गाळपातील प्रति टनामागे एका रुपया बाजूला काढून तो या संस्थेला अनुदान स्वरुपात दिला जातो. या पैशाच्या व्यवहारावर आक्षेप घेण्यात आले असून त्याची चौकशी होणार आहे. चौकशी अहवाल दोन महिन्यात सरकारला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Vasantdada)

 सरकारी अनुदानातून ऊस आणि साखरेच्या संशोधनासाठी खर्च केला जातो. पण संस्थेच्या कारभारावर शेतकरी नेत्यांकडून टीका होत होती. या संस्थेच्या चौकशीची मागणी गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित होती. अनुदानाची रक्कम साखरेच्या संशोधनासाठी वापरली जाते की इतर उद्योगांना वापरली जाते याचीही चौकशी होणार आहे.

संस्थेला अल्प दरात भाडेपट्ट्यावर मोठी जमीन दिली आहे. तिचा वापर ऊस आणि साखर उद्योगासाठी हातो यावर आक्षेप आहेत. या संस्थेतील संशोधनाचा फायदा शेतकरी आणि साखर कारखान्यांना होत नाही अशी टीका होते.

शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतण्याची संस्थेवर अनेक वर्षे कार्यरत असताना मुख्यमंत्र्यांनी संस्थेच्या चौकशीची मागणी दिली असल्याने खळबळ उडाली आहे. संस्थेचे उपाध्यक्ष अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असतानाही चौकशीचे आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Vasantdada)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00