Home » Blog » Radhakrishan elected VP: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राधाकृष्णन विजयी; इंडिया आघाडीची १४ मते फुटली

Radhakrishan elected VP: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राधाकृष्णन विजयी; इंडिया आघाडीची १४ मते फुटली

by प्रतिनिधी
0 comments
Radhakrishan elected VP

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांना ४५२ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. (Radhakrishan elected VP)
एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना एनडीएच्या एकूण संख्याबळापेक्षा १४ मते जास्त पडली आहेत. अशातच १४ खासदारांनी क्रॉस व्होटींग केल्याने इंडिया आघाडीला चांगलाच सुरुंग लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

जगदीप धनकड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा आरोग्याचे कारण देत अचानक दिला होता. त्यामुळे ही निवडणूक लागली होती. राधाकृष्णन यांना भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने उमेदवारी दिली होती. विरोधी पक्षांनीही या निवडणुकीसाठी चांगली मोट बांधली होती. सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी दाखल केली होती. दोन्ही आघाड्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. (Radhakrishan elected VP)

यासाठी सकाळी सुरू झालेले मतदान सायंकाळी ५ वाजता संपले. ९८% पेक्षा जास्त मतदान झाले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. मतमोजणीला आज संध्याकाळी ६ वाजता सुरुवात झाली. राज्यसभेचे सरचिटणीस आणि निवडणूक निर्णय अधिकारी पी.सी. मोदी यांच्या देखरेखीखाली नवीन संसद भवनात मतमोजणी सुरू होती. यात राधाकृष्णन हे निवडून आले. (Radhakrishan elected VP)

दरम्यान, किमान १४ खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, १४ खासदार मतदानापासून दूर राहिले आहेत. विशेष या निवडणुकीतही १५ मते अवैध घोषित करण्यात आली आहेत.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंग यांनी प्रत्यक्षात ‘‘मतदान करण्यास नकार देण्या’’चा पर्याय निवडला. अकाली दल वारिस पंजाब दा चे मुख्य प्रवक्ते इमान सिंग खारा यांनी सांगितले की, खासदार अमृतपाल सिंग यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्यास नकार दिला.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00