Home » Blog » Gokul General Body : ‘गोकुळ’ च्या सभेत गोंधळ,  संचालक संख्या वाढीचा ठराव मंजूर

Gokul General Body : ‘गोकुळ’ च्या सभेत गोंधळ,  संचालक संख्या वाढीचा ठराव मंजूर

by प्रतिनिधी
0 comments
Gokul General Body

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या ६३ व्या सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला. अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी अहवाल वाचन केल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासाच्यावेळी संचालिका शौमिका महाडिक यांनी संचालकाच्या संख्येत २१ वरुन २५ पर्यंत वाढ करण्याच्या ठरावावर प्रश्न विचारला असता जोरदार घोषणाबाजी झाल्याने गोंधळ उडाला. शौमिका महाडिकांनी सत्ताधाऱ्यांवर पळपुटेपणाचा आरोप केला. त्यामुळे गेल्या वर्षी काही वर्षात सुरू असलेली गोंधळाची परंपरा कायम राहिली. या गोंधळात संचालक संख्या वाढीचा महत्वाचा ठराव मंजूर झाला. (Gokul General Body)

गोकुळची निवडणूक पुढील २०२६ मध्ये होणार असल्याने पंचवार्षिक वर्षातील शेवटच्या वर्षातील या सर्वसाधार सभेकडे सभासदांचे डोळे लागले होते. गेले चार वर्षे सर्वसाधारण सभेला सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक गटातील वादाची किनार दिसायची. यंदा गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचे संचालक मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ असल्याने गोकुळच्य सभेत काय होणार याकडे लक्ष लागले होते. गेल्या चार वर्षात विरोधी गटातील संचालिक शौमिका महाडिक सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत असल्याने सभेत गोंधळ उडत असे. यंदा महायुतीचा अध्यक्ष असल्याने शौमिका महाडिक स्टेजवर बसणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण तो फोल ठरला. त्यांच्यासाठी स्टेजवर खूर्ची लावण्यात आली होती. मात्र महाडिकांनी सभासदांमध्ये बसणे पसंत केले होते. त्यामुळे गोकुळच्या सभेत यावर्षी गोंधळ होण्याची शक्यता स्पष्ट दिसत होती. (Gokul General Body)

गोकुळच्या सभेत अध्यक्षासह संचालक मंडळासह मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील, माजी आमदार के.पी.पाटील सभासदांमध्ये उपस्थित होते. अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी अहवाल वाचन केल्यानंतर ठरावाचे वाचन सुरू झाले. विषय क्रमांक नऊ वर गोकुळ संचालकांची संख्या २१ वरुन २५ वर नेण्याच्या ठरावावर त्यांनी संचालकांची संख्या का वाढवली. हे गोकुळच्या सभासदांना माहित असणे अपेक्षित आहे, अशी मागणी केली. संचालकामध्ये वाढ ही राजकीय सोय आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच प्रश्न विचारल्यामुळे माईक बंद केल्याची तक्रारही त्यांनी केली.  पण संचालकांकडून उत्तर आले नाही. त्यातच महाडिक गटाकडून घोषणाबाजी सुरू झाली. त्याला प्रत्युत्तरादाखल सत्ताधारी गटाकडूनही घोषणाबाजी सुरू झाली. त्यावेळी स्टेजवरुन तुमच्या लोकांना गोंधळ बंद करायला सांगा असे सांगण्यात आले. त्यावर शौमिका महाडिक यांनी कोणीही धक्काबुक्की केलेली नाही. घोषणाबाजी केलेली नाही. असे म्हणत त्यांनी प्रश्नांची उत्तर देण्याची मागणी केली. सत्ताधाऱ्याकडून उत्तर मिळत नसल्यानी त्यांनी त्यांच्यावर पळपटुपणाचा आरोप केला. महाडिक यांनी संचालक संख्या वाढवण्याचा प्रश्न विचारल्यानंतर गोकुळ संचालकांची संख्या २१ वरुन २५ संचालक वाढीचा ठराव मंजूर करण्यात आला.

गोकुळकडून होणार आईस्क्रीम, चीज ची निर्मिती

एकीकडे सभेत गोंधळ सुरू असतानाच गोकुळचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी भविष्यात आईस्क्रीम आणि चीजची निर्मिती करणार असल्याची घोषणा केली. तसेच नवी मुंबई शाखा वाशीसाठी मदर डेअरीची जागा खरेदी करण्यार असल्याची घोषणा केली. गोकुळ सिताफळ, अंजीर आणि गुलकंद बासुंदी बाजारात आणणार आहेत. गोकुळकडून सीएनजी पंप आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन देखील उभारण्यात येणार आहे. वासरु केंद्रामार्फत ५०० वासरे तयार करण्यात येणार आहेत.

गोकुळची उलाढाल ३ हजार ६७० कोटींच्या घरात गेली असून संस्थेला वार्षिक ११ कोटी ९७ लाख ७४ हजारांचा निव्वळ नफा झाला आहे. दैनंदिन वीस हजार लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केला असून २५ लाख लिटर दूध संकलनाचा अजेंडा ठेवण्यात आला. (Gokul General Body)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00