नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर देशभरात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर काही तासांतच भाजपने जोरदार प्रत्युत्तर देत याला लोकशाही संस्थांवरील हल्ला आणि राहुल गांधी हतबल झाल्याचे हे लक्षण आहे असे म्हटले आहे. (BJP response Rahul)
पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांनी संवैधानिक संस्थेवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ज्या राज्यांमध्ये काँग्रेस जिंकली आहे त्या राज्यांच्या मतदार याद्या ते का सादर करत नाहीत? तेजस्वी यादव यांची दोन्ही मतदार कार्ड आजच्या पत्रकार परिषदेत का आणले नाहीत?’’(BJP response Rahul)
तर, बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल सुधारणा (SIR) प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने या प्रक्रियेत कोणताही औपचारिक आक्षेप किंवा तक्रार दाखल केलेली नाही, असे सांगत भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी विरोधकांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“इंडिया आघाडीचा एसआयआरला असलेला विरोध हा राजकीय देखावा आहे, निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा आणि संस्थांमध्ये अविश्वास निर्माण करण्याचा एक हताश प्रयत्न आहे,” असे मालवीय म्हणाले. “जर त्यांना खरोखरच चिंता असेल तर औपचारिक तक्रारी कुठे आहेत? विरोधी पक्षांचे ६०,००० हून अधिक बूथ लेव्हल आहेत, त्यांपैकी एकानेही तक्रार दाखल केलेली नाही.”(BJP response Rahul)
मालवीय पुढे म्हणाले, ‘‘राहुल गांधी ‘मत चोरी’चे निराधार दावे करत आहेत. वास्तव हे आहे की, कोणीही काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करत नाही. जनतेने त्यांना नाकारले आहे. परंतु काँग्रेसच्या युवराजांना हे मान्य नाही म्हणून ते व्यवस्थेवर हल्ला करतात.’’
हेही वाचा :
राहुल यांनी फोडला बॉम्ब; पुराव्यानिशी उघड केली ‘मत चोरी’
मतापासून दूर ठेवून वंचितांचा आवाज दाबला जाऊ नये : अमर्त्य सेन
ट्रम्प यांचा ‘मॅडनेस’ आणि ‘मेथड’