मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. घनश्याम दयाळू उपाध्यक्षा यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत महाराष्ट्र सरकार, निवडणूक आयोग् आणि इतर संबधित अधिकाऱ्यांनाही पक्षकार करण्यात आले आहे. (Petition against Raj Thackeray)
याचिकेत म्हटले आहे की, राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते इतर राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर सातत्याने हिंसाचार करतात. ते भाषेच्या आधाराव राजकारण करत आहेत. जे भारतीय संविधानाच्या मूळ भावनेच्या विरोधात आहे. त्यांच्या विरोधात तात्काळ एआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत. (Petition against Raj Thackeray)
याचिकेत ललित कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश खटल्याचा दाखला देण्यात आला आहे. या खटल्याच्या निर्णयात सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितले होते की, जर एखादा दखलपात्र गुन्हा घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली, तर त्यांनी तत्काळ एफआयआर दाखल करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास, हे पोलिसांचे कायदेशीर आणि संविधानिक कर्तव्यभंग ठरेल आणि अशा पोलिसांवर कारवाई केली जाईल, असे निर्देश दिले होते. (Petition against Raj Thackeray)
याचिकेत ललिता कुमारी प्रकरणातील मार्गदर्शक तत्त्वांची देशभर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगालाही या तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश देण्याची विनंतीही करण्यात आली आहे. त्याचवेळी, याचिकाकर्त्यांनी आता न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून महाराष्ट्र सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने योग्य त्या कारवाईचे निर्देश द्यावेत, या मागणीचा पुनरुच्चारही केला आहे. (Petition against Raj Thackeray)