Home » Blog » CM alleges Thackray: पुराचे पाणी वळविण्यास उद्धव ठाकरेंकडून खीळ

CM alleges Thackray: पुराचे पाणी वळविण्यास उद्धव ठाकरेंकडून खीळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

by प्रतिनिधी
0 comments
CM alleges Thackray

सांगली : महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यास सत्तेवर आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खीळ घातली, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. (CM alleges Thackray)

भाजपच्यावतीने सांगलीत मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन आणि पावसाळ्यात १५० टीएमसी अतिरिक्त पाणी दुष्काळी मराठवाड्याकडे वळवण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अर्थसाह्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. (CM alleges Thackray)

या प्रकल्पाला मी ७२ तासांचा मुख्यमंत्री असताना मंजुरी दिली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच या कामाला खीळ घातली होती. आता आम्ही महायुती म्हणून पुन्हा सत्तेवर आलो आहोत. आम्ही सत्तेवर येताच महापुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्याच्या प्रकल्पाला गती दिली. पाऊस आपण थांबवू शकत नाही. पण, वाहून जाणारे जवळपास १५० टीएमसी पुराचे पाणी वाहून समुद्रात जाते. या पाण्यावर कर्नाटक, महाराष्ट्राचा कुणाचाच हक्क नाही. यामुळेच पुराचे पाणी साठवण्याच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कामाला आमचे सरकार गती देणार आहे. येत्या १५ दिवसांत या कामाचे भूमिपूजन होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. १५ दिवसात या कामाची निविदाही निघेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा :
अजित पवारांना दोषी धरणे अयोग्य
महावितरण ‘हाय अलर्ट’वर

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00