Home » Blog » CM on Election : पहिल्यांदा जिल्हा परिषद, नंतर महानगरपालिका निवडणुका

CM on Election : पहिल्यांदा जिल्हा परिषद, नंतर महानगरपालिका निवडणुका

मुख्यमंत्री फडणविसांची माहिती

by प्रतिनिधी
0 comments
Local Body election

सांगली : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात प्रथम जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेंच्या तर त्यानंतर १५ दिवसांत महापालिका निवडणुका होतील, असे त्यांनी सांगितले. (CM on Election)

सांगली येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सत्यजीत देशमुख, गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजप नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी सुमार झाली होती. पण या निवडणूकीतील दोष शोधून विधानसभा निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी उत्तम कामगिरी करुन महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणली. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणूका होतील. त्यानंतर पंधरा दिवसात महानगरपालिका निवडणूका होणार आहेत. कमी कालावधी असल्याने कार्यकर्त्यांनी निवडणूका जिंकण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. (CM on Election)

यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भगवान साळुंखे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहराध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, दीपक शिंदे, नीता केळकर आदी उपस्थित होते.  (CM on Election)

मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (२३ मे) कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आले होते. त्यांनी इचलकरंजीत ७०० कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ केला. सांगलीत त्यांनी पोलिस अधिक कार्यालयाचे उद्घाटन केले. तसेच आटपाडी, कडगाव पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन झाले. तसेच पोलिस निवासस्थान इमारतीचे भूमीपूजनही फडणवीस यांच्या हस्ते झाले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00