Home » Blog » Sindhi Refugee: सिंधी निर्वासितांचा ऐतिहासिक दस्तऐवज

Sindhi Refugee: सिंधी निर्वासितांचा ऐतिहासिक दस्तऐवज

सुशील गजवानींचे ‘‘सनराईज ओव्हर वळिवडे’’ आत्मकथन इंग्रजीतून प्रकाशित

by प्रतिनिधी
0 comments
Sindhi Refugee

कोल्हापूर : ‘‘सनराईज ओव्हर वळिवडे’’ हे सुशील गजवानी यांचे आत्मकथन पुण्याच्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फाउंटन प्रकाशनने प्रकाशित केले आहे. ते अंतःकरण हादरवून टाकते. फाळणीनंतर आपल्या प्रिय सिंध भूमीचा कायमचा विसर पडलेल्या सिंधी निर्वासितांच्या मानसिक आघाताचे अत्यंत प्रभावी आणि तपशीलवार चित्रण यात आहे, किंबहुना तो एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. (Sindhi Refugee)

-प्रतिनिधी

‘‘सनराईज ओव्हर वळिवडे’’चे आत्मकथनकार सुशील गजवानी आणि लेखक-दिग्दर्शक शशी गजवानी यांनी या पुस्तक निर्मितीच्या प्रेरणा पत्रकार परिषदेत उलगडल्या. पुस्तकाचा आशय असा :

आपण उल्हासनगराबद्दल, तसेच मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थानातील निर्वासित वसाहतींबद्दल ऐकले, वाचले आहे. पण या आत्मकथनात सुशील गजवानी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून कोल्हापुरातील वळिवडे कॅम्प (छावणी) मधील सुरुवातीच्या वर्षांची अतिशय संघर्षपूर्ण आणि भावनिक पापुद्रे उलगडत जातात.

जगातील कितीतरी देशांनी अनुभवलेली ही वैश्विक कथा आहे. प्रत्येक विचारशील व्यक्तीची ही गोष्ट आहे. जगात कुठेही असलेल्या प्रत्येक निर्वासिताची ही कहाणी आहे. (Sindhi Refugee)

‘सनराईज ओव्हर वळिवडे’ हे पुस्तक भारताच्या फाळणीवर आधारित इंग्रजी साहित्यातील मोठी पोकळी भरून काढते.

विशेषतः सिंध प्रदेश संपूर्णपणे पाकिस्तानकडे गेल्यानंतर घरदार गमावलेल्या हिंदू सिंधींच्या पुनरुत्थानासाठी केलेल्या संघर्षाचं हृदयद्रावक कथन आहे.

फाळणीसारख्या राजकीय निर्णयांचे दूरगामी परिणाम लाखो सिंधी बांधवांना कसे भोगावे लागले याचे विवेचन या पुस्तकात आहे.

विभाजनानंतर सिंधी निर्वासितांनी त्यांच्या प्रिय माय भूमी सिंधभूमीचे झालेले नुकसान, त्यांच्या वेदना आणि विस्थापनाचे सत्य हे पुस्तक अत्यंत प्रभावीपणे उलगडते. ते भारताच्या विभाजनाच्या वेदनादायी काळात प्रांजळपणे आणि वास्तवदर्शी पद्धतीने घेऊन जाते.

हे आत्मकथन कोल्हापूरच्या वळिवडे येथील गांधीनगर निर्वासित छावणीवर आधारित आहे. ही कथा आहे हृदयद्रावक दुःखाची आणि विनाशाची; ज्याला सामोरे जाताना साध्या, सामान्य लोकांनी विलक्षण धैर्य, जिद्द आणि लवचिकता दाखवली. त्यांनी आपल्या दुर्दैवी विस्थापनाचा स्वीकार करत नव्या पिढ्यांसाठी चांगले जीवन निर्माण करण्यासाठी अथक प्रयत्न केले.

गृहयुद्धे आणि अहंकाराची लढाई किती व्यर्थ असते ते बाजो आणि इतर सिंधी निर्वासितांनी भोगलेल्या यातना जगाला दाखवून देतात.  

ते अंतःकरण हादरवून टाकते. फाळणीनंतर आपल्या प्रिय सिंध भूमीचा कायमचा विसर पडलेल्या सिंधी निर्वासितांच्या मानसिक आघाताचे अत्यंत प्रभावी आणि तपशीलवार चित्रण यात आहे.

सिंधी लोकांना अनेकदा उथळ ठरविले जाते, त्यांचे अस्तित्व गृहित धरले जाते, त्यांची मूळ ओळख समजून घेतली जात नाही, ना तिला मान्यता दिली जाते. (Sindhi Refugee)

या पुस्तकामुळे सिंधी समृद्ध संस्कृती आणि तिचे अनेक स्तर समोर येतात. त्यांच्या संघर्षाचा आणि योगदानाचा खरा अर्थ त्यामुळे उमगल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच ते निर्वासितांच्या दुःखावर संशोधन करणारे जगभरातील अभ्यासक ‘सनराइज ओव्हर वळीवडे’ ची निश्चित दखल घेतील.

फाळणीवर बरंच साहित्य-इतिहास लिहिला गेला आहे, मात्र सिंधी समाजाच्या फाळणीनंतरच्या यातना आणि वेदनांचे चित्रण करणारे वस्तुस्थिती मांडणारे साहित्य आजवर कोणी लिहिलेले नाही. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक मैलाचा  दगड ठरेल, असा विश्वास लेखक सुशील गजवानी यांनी व्यक्त केला. पुस्तकाच्या प्रकाशिका साज अगरवाल यांच्याविषयी सुशील गजवानी यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. (Sindhi Refugee)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00