Home » Blog » Raut’s book : शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली

Raut’s book : शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली

संजय राऊत यांच्या पुस्तकात गौप्यस्फोट

by प्रतिनिधी
0 comments
Raut’s book

मुंबई : प्रतिनिधी : शरद पवारांच्यामुळे नरेंद्र मोदी यांची अटक टळली होती, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकात केला आहे. राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. खून प्रकरणात आरोपी असणाऱ्या अमित शहा यांना बाळासाहेब ठाकरे यांनी कशी मदत केली होती यांची माहितीही या पुस्तकात आहे. (Raut’s book)

खासदार राऊत यांच्या पुसतकामध्ये अनेक खळबळजनक दावे केले आहेत. पुस्तक प्रकाशनापूर्वीच या पुस्तकाची चर्चा सुरू झाली आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरात सरकार आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष सुरू होता. गुजरातचे तत्कालिन गृह राज्यमंत्री अमित शहा यांना तुरुंगात टाकले होते. त्यावेळी कारवाईचा रोख नरेंद्र मोदी यांच्यावर होता. पण शरद पवार यांनी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला अटक करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे मोदींची अटक टळली. पण मोदींनी या उपकाराचे स्मरण पुढे किती ठेवले? असे संजय राऊत यांनी पुस्तकात म्हटले आहे. (Raut’s book)

अमित शहा एका खून प्रकारात प्रमुख आरोपी होते. त्यांना तडीपारही करण्यात आले होते. अमित शहा यांना जामीन देण्यास सीबीआयच्या पथकाचा विरोध होता. सीबीआयच्या पथकात महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते. पण यावेळी शहा यांच्या मदतीला पवार धावले. मोदींनी पवारांना फोन केल्यानंतर शहांना खूनाच्या गुन्ह्यात जामीन मिळाला. हेच अमित शहा महाराष्ट्राशी कसे वागले, असा सवालही राऊत यांनी पुस्तकात केला आहे. (Raut’s book)

आज गोदीमिडिया झालेला प्रत्येकजण त्यावेळी मोदीविरोधी होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभा होता. पण त्याच मोदींनी असुरी पद्धतीने शिवसेना फोडली. पवार मोदींना भेटले तेव्हा माझ्यावर कारवाई टाळली जाईल या भाकडकथांवर माझा विश्वास नव्हता. त्यांनी मला अटक केली असेही राऊत यांनी पुस्तकात म्हटले आहे. (Raut’s book)

गुजरातमधून अमित शहा तडीपार होते. सीबीआयने फास आवळत आणल्यामुळे शाह यांच्यावर तात्पुरत्या जामिनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. बाळासाहेब ठाकरे तुम्हाला मदत करु शकतात असे कुणीतरी सुचवल्यावर एकेदिवशी अमित शहा लहान जय शहाला घेऊन विमानतळावर उतरले. विमानतळावरुन काळी पिवळी टॅक्सीने ते वाद्र्यांत आले. मातोश्रीच्या प्रवेशद्वारात त्यांना सुरक्षा रक्षकाने अडवले होते. मी गुजरात आमदार आणि माजी मंत्री आहे. बाळासाहेबांना तात्काळ भेटायचे आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर बाळासाहेबांनी अमित शहांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर मनोहर जोशी यांच्या फोनवर एका महत्वाच्या व्यक्तीला फोन केला. त्यामुळे अमित शहा यांना जामिन मिळाला. तसेच अमित शहा शिवसेना आणि ठाकरे कुटुंबासमवेत निघृणपणे वागले असे पुस्तकात राऊत यांनी म्हटले आहे. (Raut’s book)

राऊत यांच्या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि. १७)  सायंकाळी सहा वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे. प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर भूषवणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमुल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहार आहे. दैनिक सामना आणि न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.  ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत तीन महिने आर्थर रोड कारागृहात होते. तुरुंगात असताना त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00