मुंबई : प्रतिनिधी : भारतीय क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघटक म्हणून योगदान देणाऱ्या शरद पवार यांचे नाव मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला नाव देण्यात आले. तसेच भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि रोहित पवार यांचेही नाव देत त्यांचा सन्मान करण्यात आला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दिमाखदार सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, रोहित शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. (Pawar Stand)
वानखेडे स्टेडियमवरील ग्रँड स्टँड लेव्हल तीन आता शरद पवारांच्या नावाने ओळखले जाणार आहे. पवारांनी २००१ ते २०१३ दरम्यान एमसीएचे अध्यक्ष असताना मुंबई क्रिकेटचे आधुनिकीकरण केले. त्यांनी बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्षपदही भूषवले आहे. २०११ मध्ये भारतात एक दिवशीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पवार यांच्या कारकिर्दीत भरवली होती. भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना वानखेडे स्टेडियमवर झाला होता. भारताने हा अंतिम सामना जिंकून दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषकांवर नाव कोरले होते. (Pawar Stand)
डावखुरे फलंदाज असलेले अजित वाडेकर यांनी परदेशात जाऊन कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम त्याच्या कर्णधारपदाच्या कालावधीत झाला होता. भारताने इंग्लंड आणि वेस्ट विंडिजमध्ये जाऊन मालिका जिंकली होती. वाडेकर यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले होते.
रोहित शर्मा भारताचा यशस्वी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वाखाली भारताने नुकतेच आयसीसी टी २० विश्वचषक जिंकला होता. चॅम्पियन चषक रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली जिंकण्याची किमया भारताने साधली. वानखेडेवर मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडूलकर, लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्या नावावर स्टँड आहे. त्यामध्ये रोहित शर्मा याचेही नाव जोडले गेले आहे. (Pawar Stand)