Home » Blog » Ward Reservation Released : मुंबई वगळता महानगरपालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत

Ward Reservation Released : मुंबई वगळता महानगरपालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत

by प्रतिनिधी
0 comments
Ward Reservation Released

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत काढण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकानी यांनी हा आदेश काढला आहे. (Ward Reservation Released)

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरू आहे. महानगरपालिकांची नवीन प्रभाग रचना झाल्यानंतर आता प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालाय. मुंबई वगळता सर्व महानगरपालिकांसाठी प्रभाग आरक्षण सोडत होणार आहे. याबाबत राज्या निवडणूक आयोगाने सोमवारीच आदेश काढला आहे. कोल्हापूर, सांगली, पुणे, पिंपरी चिंचवड, नासिक, नागपूरसह सर्व महानगरपालिकांसाठी प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आहे. (Ward Reservation Released)

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी अखेर पार पाडायच्या आहेत. महानगरपालिकाच्या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहेत. त्यानुसार प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करण्यात येणार आहे. या जागा चक्रानुक्रमे फिरविण्यात येते. त्यानुसार ही पहिलीच निवडणूक होणार आहे. त्यानुसार आयुक्तांनी महानगरपालिकेतील आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घ्यायची आहे. (Ward Reservation Released)

महानगरपालिकेत महिला, मागासवर्ग, अनुसूचित जमाती, अनुसूचित जातीसाठी आरक्षण आहे. त्यानुसार अनुसूचित जाती व जमातीसाठी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता थेट देय होणाऱ्या जागा ही नमूद करायच्या आहेत. (Ward Reservation Released)

असा  आहे कार्यक्रम

३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर- या दरम्यान आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरिता प्रस्ताव सादर करणे

८  नोव्हेंबर-आरक्षण सोडतीचा जाहीर सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे

११ नोव्हेंबर-आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे

१७ नोव्हेंबर-प्रारुप आरक्षण, हरकती सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिद्ध करणे

२४ नोव्हेंबर-प्रारुप आरक्षण हरकती व सूचना मागविण्याची अंतिम दिनांक

२५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर  – प्रारुप आरक्षणावरून प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करून संबंधित महानगरपालिका आयुक्त यांनी आदेशाच्या परिशिष्ट ११ मधील नमुन्यात निर्णय घेणे

२ डिसेंबर-आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00