Home » Blog » D.Y. Patil : डी. वाय पाटील यांचा ९० वा वाढदिवस उत्साहात  

D.Y. Patil : डी. वाय पाटील यांचा ९० वा वाढदिवस उत्साहात  

by प्रतिनिधी
0 comments
D.Y. Patil

कोल्हापूर : प्रतिनिधी :  डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांचा ९०  वा वाढदिवस बुधवारी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी डी.वाय.पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. (D.Y. Patil)

शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या डी.वाय.पाटील यांनी  बुधवारी ९१व्या वर्षात पदार्पण केले.  कुटुंबीयांनी औक्षण करून डी.वाय.पाटील यांना निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले. यावेळी  सौ. शांतादेवी डी. पाटील, डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, सौ. राजश्री काकडे,  डॉ. प्रिया चोलेरा, सौ. वैजयंती संजय पाटील, श्री. मेघराज काकडे,  डॉ. प्रदीप पालशेतकर, पृथ्वीराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, करण काकडे, सौ. चैत्राली काकडे, यांच्यासह सुना, जावई, नातसुना-जावई, नातवंडे- पणतवंडे यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. (D.Y. Patil)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ. विजय डी. पाटील, डॉ. अजिंक्य डी. पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील,नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, माजी खासदार राजू शेट्टी, आय ए एस अधिकारी अनिल डिग्गीकर, पी.एस. आय रवी गाडे, कृषी तज्ञ बुधाजीराव मुळीक, न्या. बी. जी. कोळसे – पाटील, डॉ. कुमार सप्तर्षी, काँग्रेस नेते अभय छाजेड, डॉ. एकनाथ खेडकर,  डॉ. संजय ओक,  रुबी हॉस्पिटलचे डॉ. संदीप मुनोत, अभय कोटकर, विश्वास पाटील आबाजी, स्वामी कीर्ती महाराज राजराजेश्वरी(बेंगलोर), गणेश नेर्लेकर महाराज, शिवहरी मोतीबाबा (वाराणसी) यांनी दूरध्वनीवरून डी.वाय.पाटील यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फोनद्वारे दादासाहेबाना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. (D.Y. Patil)

खासदार शाहू महाराज छत्रपती,डी वाय पाटील विद्यापीठ, पुणेचे कुलपति डॉ पी. डी. पाटील, पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, माजी खासदार संजय मंडलिक,  माजी आमदार के पी पाटील, मानसिंगराव खोराटे, दिनमानचे संपादक विजय चोरमारे लोकमतचे संपादक सचिन जवळकोटे, मकरंद देशपांडे, माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे,  डॉ बी पी साबळे, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सतिश पावसकर, चिमणराव डांगे, धैर्यशील पाटील ( इस्लामपूर) जयंत प्रदीप पाटील, डी आर मोरे, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, किसन चौगले,  यांच्यासह यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य,पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांनी डी.वाय.पाटील यांना शुभेच्छा दिल्या. (D.Y. Patil)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00