Home » Blog » Waqf bill :‘वक्फ जेपीसी’वरुन विरोधकांचा सभात्याग

Waqf bill :‘वक्फ जेपीसी’वरुन विरोधकांचा सभात्याग

सरकारला धरले धारेवर, अहवाल परत पाठवण्याची मागणी

by प्रतिनिधी
0 comments
waqf

नवी दिल्ली : वक्फ विधेयकावरील जेपीसी अहवालावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला. जेपीसी अहवालात विरोधकांनी दर्शवलेल्या असहमतीच्या नोंदी हटवल्याबद्दल विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. जेपीसी अहवालात विरोधकांच्या मताचा, आक्षेपाचा उल्लेख नसेल तर हा बनावट अहवाल आम्ही कधीही स्वीकारणार नाही, असे सांगून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा अहवाल परत पाठवून नव्याने सादर करावा, अशी मागणी केली. (Waqf bill )

राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर वफ्क विधेयकावरील संसदेच्या संयुक्त समितीचा अहवाल गुरुवारी राज्यसभेत मांडण्यात आला. हा अहवाल यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर करण्यात आला. राज्यसभेत अहवाल स्वीकारल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. राज्यसभेचे उपसभापती जगदीप धनकड यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज परत सुरू झाल्यावर विरोधकांनी जेपीसीच्या विरोधात घोषणा दिल्या. घोषणाबाजीतच राज्यसभेचे कामकाज सुरू झाले. उपसभापती धनकड यांनी विरोधी पक्षाच्या गोंधळावर टीका केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हस्तक्षेप करत गोंधळाचा निषेध केला.(Waqf bill )

जेपीसी अहवालावर सीपीआयचे खासदार पी. संदोष कुमार म्हणाले, ‘ही भाजपची समिती आहे. संसदीय समितीच्या परंपरेचा अवमान करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली. ही समिती फक्त भाजपला मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. समितीची कार्यवाही एकतर्फी होती. या विरोधात आम्ही आंदोलन करु.’

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ‘वक्फ बोर्डावरील जेपीसी अहवालात समितीतील अनेक सदस्यांनी अहवालात असहमती दर्शवली आहे. विरोधी पक्षांनी नोंदवलेल्या असहमतीच्या नोंदी काढून टाकणे, आमचे विचार दाबून टाकणे हे योग्य नाही. हे लोकशाही विरोधी आहे. विरोधकांनी नोंदवलेले आक्षेप सादर केलेल्या अहवालातून काढून टाकलेल्या प्रकाराचा मी निषेध करतो. असे बोगस अहवाल आम्ही कधीही स्वीकारणार नाही. जर विरोधकांनी नोंदवलेल्या आक्षेपाच्या नोंदी नसतील तर विधेयक परत पाठवावे आणि पुन्हा सादर करावे.’(Waqf bill )

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू म्हणाले, ‘विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या नोंदी मी तपासल्या आहेत. अहवालातून कोणताही विषय वगळण्याचा किंवा काढून टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्व काही सभागृहाच्या पटलावर आहे. विरोधी पक्षाचे सदस्य अनावश्यक मुद्दा निर्माण करत आहेत, ज्यामध्ये तथ्य नाही. त्यांचा आरोप खोटा आहे. जेपीसीने संपूर्ण कार्यवाही नियमांनुसार केली आहे. गेल्या सहा महिन्यांत जेपीसीमधील सर्व विरोधी सदस्यांनी सर्व कामकाजात भाग घेतला. त्यांनी नोंदवलेल्या आक्षेप, मते, नोंदी अहवालाच्या परिशिष्टात जोडल्या आहेत. ते सभागृहाची दिशाभूल करू शकत नाहीत.’

वक्फ विधेयकावरील जेपीसी अहवालावर समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव म्हणाल्या, ‘आम्ही या विधेयकाला विरोध करत आहोत. संपूर्ण विरोधी पक्षाचे यावर एकमत आहे. सत्ताधारी पक्षातील काही पक्ष यावर आमच्यासोबत असू शकतात.’

हेही वाचा :

‘पीएमएलए’ तरतुदींचा गैरवापर नको

भारताची फ्रान्सला ‘पिनाका’ ऑफर

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00