Home » Blog » Virat Retired : विराट कोहली कसोटीमधून निवृत्त

Virat Retired : विराट कोहली कसोटीमधून निवृत्त

इंग्लंड मालिकेपूर्वीच निर्णय जाहीर

by प्रतिनिधी
0 comments
Virat Kohli

नवी दिल्ली : प्रतिनिधी : आपल्या तंत्रशुद्ध खेळाने क्रिकेट शौकिनांवर मोहिनी घालणारा शैलीदार भारतीय फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. आज त्याने सोशल मिडियावरुन निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. आगामी इंग्लंड दौऱ्यापूर्वीच त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्याने भारतीय संघातील मधल्या फळीतील महत्वाची एक जागा मोकळी झाली आहे. आपल्या उत्कृष्ट खेळाने कोहलीने जगभर आपले चाहते निर्माण केले आहेत. (Virat Retired)

मैदानावर नांगर टाकून आपल्या भात्यातील दणदणीत फटक्याद्वारे चौफेर फटकेबाजी करणारा विराट कोहलीचा कसोटी किक्रेटमधील खेळ थांबला आहे. ३६ वर्षीय कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले. १२३ कसोटीत त्याने ४८.७ सरासरीने ९२३० धावा केल्या. त्यामध्ये ३० उल्लेखनीय शतकांचा आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे.

२०२४-२५ च्या ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये तो शेवटचा कसोटी सामना खेळला. पर्थमधील पहिल्या कसोटीत त्याने शतक झळकावले. पण पाच सामन्यात तो १९० धावा करु शकला. शेवटच्या चार कसोटी सामन्यांमध्ये त्याने ८५ धावा जमविल्या होत्या. इंग्लंड दौऱ्यात कोहलीच्या खेळाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पण त्याने कसोटी क्रिकेटला अलबिदा केल्याने कसोटी क्रिकेटमधील त्याची खेळी पाहण्याची क्रिकेटशौकिनांची संधी हुकली आहे.  (Virat Retired)

कसोटी, वनडे, टी व्टेंटी या तिनही क्रिकेटमध्ये खेळताना आपल्या सर्वांगसुंदर खेळाचे दर्शन कोहलीने घडवले आहे. तो कायम तंदुरुस्त आणि उत्साही असतो. आक्रमक कर्णधारपद म्हणून ओळख असलेल्या विरोटने त्याच्या नेतृत्वखाली भारतीय संघाने २०१८ -१९ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. भारतीय संघाला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर नेले होते. ६८ कसोटी सामन्यात त्याने भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले होते.(Virat Retired)

कसोटी क्रिकेटमधून विराटने जरी निवृत्ती घेतली असली तरी वन डे सामन्यात तो भारताकडून प्रतिनिधीत्व करेल. यावेळच्या आयपीएल क्रिकेटमध्ये त्याने आपल्या कामगिरीत सातत्य चांगले राखले असून तो रॉयल चॅलेंज बेंगलोरकडून प्रतिनिधीत्व करत आहे.  (Virat Kohli)

विराट कोहलीची कसोटी कारकीर्द अशी

एकूण सामने १२३,

इंनिग्ज २१०,

नाबाद १०,

सर्वोच धावसंख्या नाबाद २५४,

एकूण धावा ९२३०,

सरासरी ४६.८५,

शतके ३०,

अर्धशतके ३१,

चौकार १०२७,

षटकार ३०,

झेल १२१.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00